सातारा - राज्यासह देशात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाऊन सुरू आहे. या काळात वाई तालुक्यातील वंदनगडावर वन क्षेत्रात बेकायदेशीरपणे पार्टी करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध वाई वन विभागाने गुन्हा दाखल केला.
अब्दुल बादशहा इनामदार (वय ३९),शाहरुख उस्मान इनामदार (वय २२), रमेश मानसिंग शिंदे (वय १९), अरबाज शौकत नगरजी (वय २२), इस्माईल अजीज इनामदार (वय ४३), अंजुम इस्माईल इनामदार (वय ३४), रीना हुसेन इनामदार (वय २७), हुसैन सत्तार इनामदार (वय ३०) व सरताज शब्बीर इनामदार (वय २५, सर्व रा. बेलमाची ता. वाई जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
वनाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व संशयित वंदनगडावर बेलमाची (ता. वाई)च्या राखीव वनक्षेत्रात पार्टीसाठी गेले होते. याबाबतची खबर मिळाल्यानंतर संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर भारतीय वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एम. आर. मोरे, वनरक्षक आर. एस. शेख, एल बी झाडे यांनी केले.