ETV Bharat / state

साताऱ्यातील बंड काही प्रमाणात थंड; मैदानात फक्त दिग्गजांमध्ये लढत - भाजपचे शिवेंद्रराजे भोसले

छाननीनंतर उरलेल्या 108 उमेदवारांपैकी 35 अर्ज मागे घेण्यात आले असून सध्या जिल्ह्यातील आठ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात 73 उमेदवारांमध्ये लढत आहे. तसेच लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.

छाननीनंतर उरलेल्या 108 उमेदवारांपैकी 35 अर्ज मागे घेण्यात आले असून, सध्या जिल्ह्यातील आठ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात 73 उमेदवारांध्ये लढत आहे.
author img

By

Published : Oct 8, 2019, 9:53 AM IST

सातारा - छाननीनंतर उरलेल्या 108 उमेदवारांपैकी 35 अर्ज मागे घेण्यात आले असून सध्या जिल्ह्यातील आठ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात 73 उमेदवारांमध्ये लढत आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कराड दक्षिण मतदारसंघात 6 अर्ज मागे घेतल्यानंतरही जिल्ह्यातील सर्वाधिक 13 उमेदवाराची लढत रंगणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्यामध्ये चुरशीचा सामना आहे.

हेही वाचा रत्नागिरीतील भाजपचे बंडोबा अखेर थंड; पाचही उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

सातारा मतदारसंघात आठपैकी 2 अर्ज मागे घेण्यात आले असून, रिंगणात 6 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले व राष्ट्रवादीचे दिपक पवार यांच्यामध्ये लढत लक्षवेधी असणार आहे. फलटणमध्ये 16 पैकी 5 अर्ज मागे घेण्यात आल्याने सध्या रिंगणात 11 उमेदवार आहेत. वाई मतदारसंघात एकूण 13 पैकी तिघांनी माघार घेतल्याने उरलेल्या 10 उमेदवारांमध्ये लढत आहे. कराड उत्तर मतदारसंघात 11 पैकी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यात आले असून, उर्वरित 6 जण निवडणूक लढवत आहेत. तसेच कोरेगाव मतदारसंघात 12 मधील 5 अर्ज मागे घेण्यात आले असून, ७ जण रिंगणात आहेत.

हेही वाचा रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७८ उमेदवार रिंगणात, 34 जणांची माघार

पाटणमध्ये 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामधील 4 अर्ज मागे घेण्यात आल्याने 9 उमेदवार मैदानात आहेत. माण मतदारसंघात 16 पैकी 5 अर्ज मागे घेण्यात आले असून, 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.

Intro:सातारा - जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागांसाठी छाननीनंतर उरलेल्या १०८ उमेदवारांपैकी ३५ अर्ज मागे घेण्यात आले असून आता निवडणुकीच्या रिंगणात ७३ उमेदवार राहिले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण मतदारसंघात ६ अर्ज मागे घेतल्यानंतरही रिंगणात जिल्ह्यात सर्वाधिक १३ उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्यात येथे चुरशीचा मुकाबला आहे. Body:साताऱ्यात आठ पैकी २ अर्ज मागे घेण्यात आले असून रिंगणात ६ उमेदवार राहिले आहेत. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले व राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्यात या ठिकाणी लक्षवेधी लढत पहायला मिळणार आहे. फलटणमध्ये १६ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून रिंगणात ११ उमेदवार राहिले आहेत. वाईत १३ पैकी तिघांनी माघार घेतली असून रिंगणात १० उमेदवार आहेत. कराड उत्तरमध्ये ११ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून ६ जण निवडणूक लढवत आहेत. कोरेगाव मतदारसंघात १२ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून ७ जण रिंगणात आहेत. पाटणमध्ये १३ पैकी ४ अर्ज मागे घेण्यात आले असून ९ उमेदवार रिंगणात आहेत. माणमध्ये १६ पैकी ५ अर्ज मागे घेण्यात आले असून ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकारांना दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.