सातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यातील पोवई नाका परिसर येथे आली असता, यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये कॉलर उडवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
हेही वाचा... भाजपवासी झालेल्या उदयनराजेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सल्ला, आत्मचिंतन-आत्मपरीक्षण करावे
महाजनादेश रॅलीत उदयनराजे सामील झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा... भाजपची महाजनादेश यात्रा साताऱ्यात दाखल
सातारा जिल्ह्यात दुपारी महाजनादेश यात्रेचे स्वागत झाल्यानंतर छत्रपती उदयनराजे कुठेही दिसले नाही. मात्र, साताऱ्यातील पोवई नाका येथे ते थांबले होते. महाजनादेश यात्रेची गाडी पोवई नाक्यावर येताच उदयनराजे यांना पाहून मुख्यमंत्र्यांनी आपली गाडी थांबवली आणि खाली उतरत उदयनराजेंची गळाभेट घेतली. यानंतर ते दोघे आणि माजी आमदार शिवेंद्रराजे शिवतीर्थावर गेले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यानंतर सर्वजण पुन्हा गाडीवर जाताच उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवली., यामुळे कार्यकर्त्यांनी पुन्हा जल्लोष करत घोषणा दिल्या.
हेही वाचा... गुहागरमधून भास्कर जाधवांना उमेदवारी निश्चित? जन आशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरेंनी दिले संकेत