ETV Bharat / state

लॉकडाऊन: कराडमध्ये पोलीस आक्रमक; वाहने जप्तीला सुरूवात - satara lockdown

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांनी बुधवारी आरटीओच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. एका दिवसात शंभरहून अधिक वाहने जप्त करून एक लाखापेक्षा अधिक दंड वसूल केला. लॉकडाऊन झाल्यापासून आतापर्यंत कराड पोलिसांनी पाचशेहून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे

लॉकडाऊन: कराडमध्ये पोलीस आक्रमक; वाहने जप्तीला सुरूवात

author img

By

Published : Apr 10, 2020, 12:21 PM IST

सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांनी बुधवारी आरटीओच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. एका दिवसात शंभरहून अधिक वाहने जप्त करून एक लाखापेक्षा अधिक दंड वसूल केला. लॉकडाऊन झाल्यापासून आतापर्यंत कराड पोलिसांनी पाचशेहून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरी थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक दवाखाना, मेडिकलचे निमित्त करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरटीओच्या मदतीने बुधवारी संयुक्त मोहीम राबवत दुचाकी, जीप, कार, मिनी टेम्पो आणि बोगस अत्यावश्यक सेवेचा परवाना घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली. जप्त केलेली वाहने भेदा चौकातील रिकाम्या जागेत तसेच वाहतूक शाखेसमोरील रिकाम्या जागेत लावण्यात आली आहेत. संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरल्याप्रकरणी या वाहनधारकांना लाखो रूपयांचा दंड करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, आरटीओ अधिकारी संतोष काटकर यांच्या उपस्थितीत पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे, तोपर्यंत लोकांनी घरीच थांबून सुरक्षित राहावे. विनाकारण रस्त्यावर फिरून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. अत्यावश्यक सेवेचा खोटा परवाना घेऊन किंवा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करत वाहन जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. कारवाई केलेल्या वाहनधारकांना 8 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे नागरीकांनी घरी थांबून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सुरज गुरव यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.