ETV Bharat / state

सैनिक स्कूलच्या विकासाला गती देणार; पालकमंत्र्यांकडून स्कूलची पाहणी

author img

By

Published : Mar 19, 2021, 2:11 AM IST

पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, सैनिक स्कूलची स्थापना 1961 साली झाली आहे. या शाळेचा परिसर सुमारे 115 एकर असून या ठिकाणी 630 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सैनिक स्कूल मधील काही इमारती 1932 व 1962 या वर्षातील आहेत. त्या जुन्या झालेल्या आहेत. राज्य शासनाने सैनिक स्कूलच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे...

satara guardian minister Balasaheb Patil Visited military school
सैनिक स्कूलच्या विकासाला गती देणार; पालकमंत्र्यांकडून स्कूलची पाहणी

सातारा : सैनिक स्कूलचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. विकास कामांसाठी राज्य शासनाने 300 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज सैनिक स्कूलच्या पाहणी दरम्यान दिली.

या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजयकुमार मुनगिलवार, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, कार्यकारी अभियंता एस. पी. दराडे, सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरमाडे, उपप्राचार्य बी. लक्ष्मीकांत, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, सैनिक स्कूल चे माजी विद्यार्थी अमर जाधव आदी उपस्थित होते.

115 एकराचा शाळा परिसर..

पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, सैनिक स्कूलची स्थापना 1961 साली झाली आहे. या शाळेचा परिसर सुमारे 115 एकर असून या ठिकाणी 630 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सैनिक स्कूल मधील काही इमारती 1932 व 1962 या वर्षातील आहेत. त्या जुन्या झालेल्या आहेत. राज्य शासनाने सैनिक स्कूलच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. विकासासाठी निधी उपलब्ध झाल्याने आता शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.

अधिकाऱ्यांना केल्या सूचना..

सैनिक स्कूलच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्या कामाला आता गती द्यावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी एनडीए ब्लॉक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, डहाणूकर हॉल, कॅन्टीन, शाळेची मुख्य इमारत याबरोबरच सैनिक स्कूलच्या मैदानाची पाहणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.