सातारा - सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्याला झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्रीही उशिरा जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, ओढे, नाले भरून वाहत आहेत. म्हसवड भागातील माण नदी परिक्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच खटाव तालुक्यातील नेर धरण संपूर्ण भरल्याने तात्पुरता पाणीप्रश्न मिटल्याचे चित्र आहे.
हेही वाचा दुष्काळी माणदेशात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
कुळकजाई येथून उगम पावणाऱ्या माण गंगा आणि बाण गंगा या दोन्ही नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच आंधळी धरण परिसरात झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठा वाढला आहे.