ETV Bharat / state

Satara Double Murder : दुहेरी हत्याकांडानं सातारा हादरलं! शेतात पाणी द्यायला गेलेल्या दाम्पत्याची निर्घृण हत्या - दहिवडी पोलीस

Satara Double Murder : साताऱ्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्रानं वार करुन खून केल्यानं खळबळ उडाली आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Satara Double Murder
Satara Double Murder
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 5:40 PM IST

Updated : Oct 8, 2023, 8:28 PM IST

सातारा Satara Double Murder : पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेलेल्या दाम्पत्याची अज्ञातानं धारदार शस्त्रानं हत्या केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील माण तालुक्यात घडलीय. संजय रामचंद्र पवार (वय ४९) आणि मनिषा संजय पवार (वय ४५) असं खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

रात्री दाम्पत्य गेले होते शेतात : माण तालुक्यातील आंधळी गावातील संजय व मनिषा हे दाम्पत्य आपल्या 'पवार दरा' नावाच्या शिवारातील पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री गेले होते. यावेळी रात्री साधारणतः दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञातांनी धारदार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या केली आहे.

रविवारी सकाळी घटना आली उघडकीस : रविवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात जात असताना संजय व मनिषा पवार दाम्पत्याचे रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आले. त्यामुळं हत्येची घटना उघडकीस आली. नागरिकांनी मृतदेह बघताच आंधळी गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली. पोलीस पाटलानं यासंदर्भात पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले.

श्वान पथकालाही पाचारण : या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसंच संशयिताच्या तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी दहिवडी पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आहेत. या दाम्पत्याच्या हत्येमागे शेताचा वाद की अन्य कारण आहे हे संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलंय.

या खुनाप्रकरणी दाम्पत्याचा सख्ख्या चुलत भावाला ताब्यात घेत चौकशी सुरु केलीय. त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. - सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे

संशयित ताब्यात : दाम्पत्याच्या खून प्रकरणात सख्ख्या चुलत भावाला दहिवडी पोलिसांनी अटक केलीय. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार असं या संशियीताचं नाव आहे.

हेही वाचा :

  1. Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
  2. Pune Murder News : खून करून पोलीसांनी पकडू नये म्हणून आरोपीनं लढविली अनोखी शक्कल; पाहून पोलीसही चक्रावले
  3. Supreme Court On Identical Evidence : एकाच प्रकारच्या पुराव्यात एकाला शिक्षा तर दुसऱ्याची सुटका करु नका - सुप्रीम कोर्टाची गुजरात कोर्टाला चपराक

Last Updated : Oct 8, 2023, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.