ETV Bharat / state

Coronavirus : सातारा जिल्हा रेड झोनमध्ये, राज्यातील 14 जिल्ह्यांचा समावेश - कोरोना विषाणू

देशाची रूतलेली चाके गतीमान करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सातारा जिल्ह्याला कोणतीही सूट मिळणार नाही.

Satara
सातारा जिल्हा रेड झोनमध्ये
author img

By

Published : May 3, 2020, 9:41 AM IST

सातारा - पुण्यात कोरोनाबाधितांचे दशक पूर्ण झाले होते. तेव्हा साताऱ्यात सर्वकाही आलबेल सुरू होते. या कोरोनाचा व जिल्हय़ाचा काही संबंधच नव्हता. पण, 23 मार्चला पहिला रूग्ण आढळल्यापासून गेल्या 37 दिवसांत जिल्ह्याने रेड झोनची रेषा ओलांडली. केंद्राने देशात 130 तर महाराष्ट्रात 14 जिल्हे रेड झोनमध्ये सहभागी केले आहेत. त्यात साताऱ्याचाही समावेश झाला आहे.

देशाची रूतलेली चाके गतीमान करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सातारा जिल्ह्याला कोणतीही सूट मिळणार नाही. सातारा व कराड या दोन्ही शहरांमध्ये बाधित सापडल्याने ही शहरं आधीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाली आहेत.

त्यामुळे आता सलग 21 दिवस एकही कोरोनाबाधित रूग्ण सापडला नाही, तरच त्या जिल्हय़ाचा झोन बदलू शकतो. तर लॉकडाऊनमधून फक्त ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनला शिथिलता मिळणार आहे. त्यामुळे पुढील 21 दिवस जिल्हय़ाला आणखी खूपच सतर्कता ठेवावी लागणार असल्याचे आरोग्य यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.