सातारा - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Satara Crime Branch) साताऱ्यातील वाढे फाटा हद्दीतील एका भंगार दुकानाच्या परिसरातून ५ लाख २२ हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त (Ganja Tree Seized Satara) केली आहेत. याप्रकरणी परशुराम ठाकूर (रा. करंजे, सातारा) या संशयितावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला (Satara Crime News) आहे.
भंगार दुकानाच्या परिसरात गांजाची लागवड - सातारा शहरानजीकच्या वाढे फाटा येधील जयदुर्गा स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकानाच्या परिसरात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने भंगार दुकानावर छापा मारून गांजाची झाडे जप्त केली आहेत. बाजारात या गांजाची किंमत ५,२२,००० रूपये आहे.
पोलीस अधीक्षकांकडून एलसीबीचे कौतुक - उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विक्रम, पिसाळ, गणेश कापरे, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, वैभव सावंत, धीरज महाडीक, संभाजी साळुंखे, फॉरेन्सिक विभागाचे कॉ. राजू कंभार, अमोल जाथव यांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले.