सातारा - टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात शिथिल केलेले नियम पुन्हा कठोर करण्यात आले आहेत. शाळा-महाविद्यालयांबरोबरच काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली केशकर्तनालय व ब्युटी पार्लर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात 30 जूनपर्यंत लागू करण्यात आलेले टाळेबंदीचे सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार कोरोना रुग्ण सापडेल, त्या ठिकाणी प्रतिबंधित (कंटेन्मेंट) क्षेत्र जाहीर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात यांना असणार प्रतिबंध - सर्वांना रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत फिरण्यास सक्त मनाई
- 65 वर्षांवरील व्यक्ती, व्याधीग्रस्त व्यक्ती, गर्भवती, 10 वर्षांखालील मुले यांनी घरातच रहावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग संस्था बंदच.
- चित्रपटगृहे, जिम, व्यायामशाळा, मॉल व बाजारपेठ संकूल, स्विमिंग पूल, थिएटर, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय व तत्सम सर्व बंद राहणार आहे.
- सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा घेता येणार नाहीत.
- सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळेेबंद राहणार आहेत.
- केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर सुरू करता येणार नाहीत.
- शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस यापुढेही बंद ठेवावे लागणार आहे.
हे राहणार सुरू
* सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खासगी आस्थापना
▪ क्रीडांगण, स्टेडियम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व सामाजिक अंतर ठेवून व्यायाम करता येईल.
▪ सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस अटींवर परवानगी देण्यात येणार आहे.
▪ प्रवासी क्षमतेच्या 50% क्षमतेने जिल्ह्यांतर्गत बससेवा ठेवता येणार आहे.
▪ सर्व मार्केट /दुकाने सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेमध्ये चालू राहणार आहेत.
▪ आंतरराज्य व जिल्ह्यातील वाहतुकीस निर्बंध राहणार आहेत
▪ सर्व प्रकारच्या वस्तूंच्या आंतरराज्य वाहतुकीस मान्यता.
▪ लग्न समारंभास 50 पर्यंत त,र अंत्यविधीसारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना परवानगी.
▪ दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकात किमान सहा फूट अंतर राहील याची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दुकानात 5 व्यक्तींना घेण्यास मनाई.