सातारा - लोकसभा मतदार संघासाठी युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आज अर्ज दाखल करणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेत. यावेळी त्यांच्या सोबत राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, कृष्णा खोरे महामंडळ उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर हे सातारा येथे उपस्थित होते.
आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. निवडून आल्यानंतर बेरोजगारी, दुष्काळ, पाणी प्रश्न, शिक्षण या क्षेत्रात काम करणार असल्याचे नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.