ETV Bharat / state

मायणी अभयारण्यात चंदन चोरीला उधाण, अज्ञातांकडून चंदनाच्या झाडावर कुऱ्हाड - A sandalwood tree stolen in Mayani Sanctuary

गेल्या काही वर्षापासून थंडावलेल्या रक्तचंदन झाडांच्या चोऱ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले का काय? ही भीती वर्तवली जात आहे. या तलावाला आणि वनराईला सुरक्षा नसल्यानेच ही चोरी वाढली की? कोणाचा वरदहस्त याला कारणीभूत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मायणीअभयारण्यात चंदन झाडांची चोरी
author img

By

Published : Nov 20, 2019, 8:55 PM IST

सातारा - मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या सभोताली असणाऱ्या वनराईतील रक्तचंदनाची झाडे बेधडकपणे तोडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनराईत प्रवेश करून तलावाकडे जाण्यासाठी मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या मुख्य गेट पासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील ही चंदनाची झाडे तोडण्यात आली आहेत. या प्रकारामुळे वनराईची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यंदा तलावात पाणी आल्याने सर्वत्र हिरवळ पसरली आहे. यामुळे तलावातील सभोवताली असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्रात असंख्य जातीची झाडे पहावयास मिळतात, यात रक्तचंदनाच्या झाडांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षापासून थंडावलेल्या रक्तचंदन झाडांच्या चोऱ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले का काय? ही भीती वर्तवली जात आहे. या तलावाला आणि वनराईला सुरक्षा नसल्यानेच ही चोरी वाढली की? कोणाचा वरदहस्त याला कारणीभूत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

हिरवळ पानाफुलांनी बहरनाऱ्या चंदनाच्या झाडाची कुठे कत्तल तर कोठे झाडांवर अर्धवट कुऱ्हाड चालवल्याने ही झाडे सुकून जाऊ लागली आहेत. याला जबाबदार कोण? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सध्या मुख्य गेटच्या दोन्ही गेट पैकी वापरण्यात असलेल्या एका गेटची अवस्थाही दयनीय आहे. तर कोठे कुंपणाच्या तारा तुटल्या आहेत, तर काही ठिकाणी कुंपणाचे सिमेंट खांबच कोलमडून पडले आहेत. यामुळे आसपासची जनावरे खुलेआम वनराईत जाऊन दिवसभर चरत आहेत. यामुळे मुख्य गेट सोडून अन्यही प्रकारे वनखात्याच्या जमिनीत खुलेआम शिरकाव करता येत असल्याने मायणी ब्रिटिशकालीन तलाव व पक्षी आश्रयस्थानातील वनराईची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचेच म्हणावे लागेल.

तलाव भरल्याने पक्षांच्या ओढीने पर्यटकांची वाढलेली संख्या ,अवैध रित्या वनखात्याच्या क्षेत्रात होणार लोकांचा प्रवेश ,घनदाट झाडीचा प्रेमी युगलांकडून होणार गैरवापर , यामुळे वाढलेले मायणी तलाव क्षेत्रातील अवैध धंदे याकडे वनखाते,पाटबंधारे विभाग व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन चंदनतस्करीचा बिमोड करावा ही मागणी जोर धरू लागली आहे.

Intro:सातारा मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या सभोतली असणाऱ्या वनराईतील रक्तचंदनाच्या झाडाची बेधडक पणे तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून वनराईत प्रवेश करून तलावाकडे जाण्यासाठी मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या मुख्य गेट पासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील ही चंदनाची झाडे तोडण्यात आल्याने वनराईच्या सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Body:यंदा तलावात पाणी आल्याने सर्वत्र हिरवळ पसरली आहे,यामुळे तलावातील सभोवताली असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्रात असंख्य जातीची झाडे पहावयास मिळतात , यात रक्तचंदनाच्या झाडांचाही समावेश आहे . गेल्या काही वर्षापासून थंडवलेल्या रक्तचंदन झाडांच्या चोऱ्यानी पुन्हा एकदा डोके वर काढले का काय ? ही भीती वर्तवली जात आहे. यास तलावास व वनराईस नसलेली सुरक्षा जबाबदार आहे का? कोणाचा वरदहस्त यास कारणीभूत आहे याचा आता शोध घ्यावा लागेल.
हिरवळ पानाफुलांनी बहरनाऱ्या चंदनाच्या झाडाची कुठे कत्तल तर कोठे झाडांवर अर्धवट कुऱ्हाड चालवल्याने ही झाडे सुकून जाऊ लागली आहेत. यास जबाबदार कोण ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सध्या मुख्य गेटच्या दोन्ही गेट पैकी वापरण्यात असलेल्या एक गेटची अवस्थाही दयनीय आहे. तर कोठे कुंपणाच्या तारा तुटल्या आहेत तर कोठे कुंपणाचे सिमेंट खांबच कोलमडून पडले आहेत. यामुळे आसपासची गुरेढोरे खुलेआम वनराईत जाऊन दिवसभर चरत आहेत. यामुळे मुख्य गेट सोडून अन्यही प्रकारे वनखात्याच्या जमिनीत खुलेआम शिरकाव करता येत असल्याने मायणी ब्रिटिशकालीन तलाव व पक्षी आश्रयस्थानातील वनराईची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचेच म्हणावे लागेल.

Conclusion:तलाव भरल्याने पक्षांच्या ओढीने पर्यटकांची वाढलेली संख्या ,अवैध रित्या वनखात्याच्या क्षेत्रात होणार लोकांचा प्रवेश ,घनदाट झाडीचा प्रेमी युगलांकडून होणार गैरवापर , यामुळे वाढलेले मायणी तलाव क्षेत्रातील अवैध धंदे याकडे वनखाते,पाटबंधारे विभाग व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन चंदनतस्करीचा बिमोड करावा ही मागणी जोर धरू लागली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.