ETV Bharat / state

Robbery on Veterinary Officer House : पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्य गंभीर जखमी - दाम्पत्य गंभीर जखमी

कराड तालुक्यातील मसूर येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून १६ तोळे दागिने आणि ९ हजारांची रोकड, असा ४ लाख ९८ हजारांचा ऐवज लुटण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात डाॅ. संपत हिराप्पा वारे (वय ५२) आणि अनिता संपत वारे (४८) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले ( Robbery on Veterinary Officer House ) आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Mar 2, 2022, 4:50 PM IST

कराड (सातारा) - कराड तालुक्यातील मसूर गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून १६ तोळे दागिने आणि ९ हजारांची रोकड, असा ४ लाख ९८ हजारांचा ऐवज लुटण्यात आला ( Robbery on Veterinary Officer House ) आहे. बुधवारी (दि. 2 मार्च) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून दरोडेखोरांच्या हल्ल्यात डाॅ. संपत हिराप्पा वारे (वय ५२ वर्षे) आणि अनिता संपत वारे (वय ४८ वर्षे) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर कराडमधील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळ
घटनास्थळ

सशस्त्र दरोड्याने मसूर बाजारपेठ हादरली - पुणे-बंगळुरू महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले मसूर हे बाजारपेठेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मसूरहून खटाव तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात जाणाऱ्या मसूर-शामगाव मार्गावरील संतोषी मातानगरच्या नविन गावठाणमध्ये डॉ. संपत वारे यांचा बंगला आहे. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंगल्यावर पाच ते सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. सकाळी या घटनेची माहिती मसूर परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या दरोड्यामुळे मसूर बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

सोळा तोळ्याच्या दागिन्यांची लूट - दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केल्यानंतर काही खोल्यांना बाहेरून कड्या घातल्या. डाॅ. वारे आणि त्यांच्या पत्नीस जबर मारहाण केली. दरोडेखोरांच्या मारहाणीत वारे दाम्पत्य गंभीररीत्या तजखमी झाले. चोरट्यांनी बंगल्यातील कपाटे फोडून १६ तोळ्यांचे दागिने आणि ९ हजारांची रोकड लंपास केली. दरोडा टाकून जाताना बंगल्याच्या आवारातील गाडीची काच चोरट्यांनी फोडली. त्या आवाजाने शेजारील लोक जागे झाले. त्यांनी घराच्या खिडकीतून पाहिले असता पाच ते सहा जण बंगल्यातून जाताना दिसले.

श्वान पथकाने कॅनॉलपर्यंत काढला माग - सशस्त्र दरोड्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल ( Satara SP AjayKumar Bansal ), पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड हे घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने बंगल्याच्या दक्षिणेकडील कॅनॉलपर्यंत माग काढला. मसूर पोलीस दूरक्षेत्रात दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत.

हेही वाचा - Hard Labor In Child Sexual Case : बाल लैंगिक अत्याचाराच्या खटल्यात सुनावली २० वर्षे सक्तमजुरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.