ETV Bharat / state

पाटण शहरातील रस्ते 'सील' केल्याने गर्दी आटोक्यात, प्रशासनाची देखरेख - पाटण शहर रोड सील

पाटण शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने आजूबाजूला गावातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक मोठी गर्दी करत होते. यामुळे बाजारासह रस्त्यांवरही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याशिवाय शासनाच्या अत्यावश्यक सेवेच्या खरेदी वेळेच्या मर्यादेनंतरसुद्धा गावात गर्दी होत असल्याचे दिसून येत होते.

पाटण शहरातील रस्ते सील केल्याने गर्दी आटोक्यात, प्रशासनाची देखरेख
author img

By

Published : Apr 24, 2020, 1:30 PM IST

सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला लॉकडाऊन, नाकाबंदी आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी शासनानेच घालून दिलेल्या मर्यादित वेळेमुळे पाटण शहरात रस्ते, बाजारपेठात ग्राहक, व्यापारी, भाजी व फळविक्रेते यांची अक्षरशः जत्राच भरल्याचे चित्र पहायला मिळत होते. यामुळे प्रशासन, पोलीस हतबल झाले होते. याची प्रशासनाने व पोलिसांनी गंभीर दखल घेत बुधवारी पाटण शहरात प्रवेश करणारे रस्ते सील केले आहेत. त्यामुळे पाटण शहरात होणारी गर्दी आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

पाटण शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने आजूबाजूला गावातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक मोठी गर्दी करत होते. यामुळे बाजारासह रस्त्यांवरही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याशिवाय शासनाच्या अत्यावश्यक सेवेच्या खरेदी वेळेच्या मर्यादेनंतरसुद्धा गावात गर्दी होत असल्याचे दिसून येत होते.

याची गंभीर दखल घेत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पाटण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक तृप्ती सोनवणे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी शहरातील मुळगाव पूल, कराड -चिपळूण रस्ता, चाफोलीरोड, आंबेडकर चौक, विक्रमनगर, पाटण-मणदुरे रोड याठिकाणी बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत रस्ते बंद करुन पाटण शहरात एकही दुचाकी येवून न देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाणे गुरुवारी सकाळपासूनच पोलिसांनी कडक कारवाई केल्याने पाटण शहरातील गर्दीवर ताबा मिळवण्यात प्रशासनासह पोलिसांना यश आल्याचे दिसून आले.

दरम्यान, कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले नाही. पाटण शहरात प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस उपनिरीक्षक तृप्ती सोनवणे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी पाटण शहरात पाहणी करुन सातत्याने माहिती घेत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.