सातारा - जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण हे ३३५६८ मतांनी विजयी झाले होते. तसेच ते सलग दोन वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिगंबर आगवणे व शिवसेनेचे नंदकुमार तासगावकर यांचा पराभव केला होता. मात्र याच मतदारसंघात असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपवासीय होऊन माढा लोकसभा खासदार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला या तालुक्यातून १ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे पारडे जड राहील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघातील प्रश्न आजही कायम आहेत. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रणधुमाळी विधानसभेची : रामराजे निंबाळकर राखणार का फलटणचा गड..? - Assembly election
विधानभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जात होता. मात्र येथील दोन राजेंनी भाजपप्रवेश केल्याने राष्ट्रवादीला घरघर लागली. आता फलटन मतदारसंघात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी हा गड लढविणार आहे. मात्र माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा फलटनचा गड रामराजे निंबाळकर राखणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..
सातारा - जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण हे ३३५६८ मतांनी विजयी झाले होते. तसेच ते सलग दोन वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिगंबर आगवणे व शिवसेनेचे नंदकुमार तासगावकर यांचा पराभव केला होता. मात्र याच मतदारसंघात असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपवासीय होऊन माढा लोकसभा खासदार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला या तालुक्यातून १ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे पारडे जड राहील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघातील प्रश्न आजही कायम आहेत. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यांचा पराभव केला होता. मात्र याच मतदारसंघात असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपवासीय होऊन माढा लोकसभा खासदार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला या तालुक्यातून १ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे पारडे जड राहील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. या मतदारसंघातील प्रश्न आजही कायम आहेत. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Body:या ठिकाणचे प्रश्न
या तालुक्यात मोठं मोठ्या कंपनी आहेत. मात्र या ठिकाणी बाहेर कामगार असल्याने याठिकाणचा रोजगाराचा प्रश्न कायम आहे. रोजगार, औद्योगिक विकास यांचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. यासोबत पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील असल्याने गेल्या अनेक वर्षात पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. तालुक्यात बहुसंख्य गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. रस्त्यांचा प्रश्नही गंभीरच आहे. सिंचनासाठी पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे.
राजकीय समीकरण
फलटण तालुक्यातील राजकारण फक्त दोन राजे गटांभोवती फिरते. रामराजे नाईक निंबाळकर व रणजीतसिंह नाईक निंबाळकर मात्र या मध्ये सध्या नवीन नावाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे दिगंबर आगवणे सध्या फलटण विधानसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटा विरोधात विधानसभा लढवणार असल्याचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे. मात्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला समजला जातो.Conclusion: