ETV Bharat / state

संतोष देशमुख कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैवी; संभाजीराजेंचं टीकास्त्र - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

हत्या होऊन महिना उलटला तरी सर्व आरोपी पकडले गेले नाहीत, पोलिसांवर राजकीय दबाव आहे का अशी शंका येते, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.

Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजे छत्रपती (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 24 hours ago

कोल्हापूर - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व पक्षीयांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलंय. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळिमा गोष्ट फासणारी आहे, हत्या होऊन महिना उलटला तरी सर्व आरोपी पकडले गेले नाहीत, पोलिसांवर राजकीय दबाव आहे का अशी शंका येते, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.

तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार‌ : जोपर्यंत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार‌ आहे, असं संभाजीराजे म्हणालेत. हत्या झालेल्या संतोष देशमुख कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं हे दुर्दैवी असल्याची टीका स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

बीडमधील असंतोषाला मंत्री मुंडे कारणीभूत : बीड हत्या प्रकरणात सातत्याने असंतोषाला कारणीभूत मंत्री मुंडे ठरीत आहेत, मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत, धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का? असा सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का? असा सवालही उपस्थित केलाय.

जनतेला मूर्खात काढत आहात का? : तसेच महाराष्ट्राच्या जनतेला मूर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत, पोलीस ते व्हिडीओ जनतेसमोर का आणत नाहीत? असे सवाल उपस्थित करत हत्येप्रकरणी त्यांनी टीकास्त्र सोडले. संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली, त्यामध्ये वाल्मिक कराडसोबत संबंध असलेले अधिकारी आणि मंत्री धनंजय मुंडे निवडणुकीत जिंकल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. बीडमधील लहान मुलांपासून ते सर्वांना माहिती आहे, असंही संभाजीराजे म्हणालेत.

महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवण्याचे काम : या प्रकरणातील आरोपी कोण आहेत, मग सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे, महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवण्याचे काम या घटनेमुळे होत आहे, या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा देऊन दहशत मोडीत काढण्याचे पहिलं पाऊल उचलावं. तसंच याप्रकरणी अनेकांना धमकी आली आहे, मात्र मला धमकी देण्याचे धाडस कोण करत नाही, जर कोणी धमकी देण्याचे धाडस केलं तर पुढे बघू, असा इशाराही संभाजीराजेंनी दिलाय.

संभाजीराजे छत्रपती (Source- ETV Bharat)

शरद पवारांची भूमिका योग्य : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी शरद पवारांनी उचललेले पाऊल योग्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मतदारांना मालक झाला आहात का? असं म्हणणं योग्य नाही, मतदारांसमोर आपण हात जोडून जात असतो, त्यांना सन्मान दिला पाहिजे, असेही यावेळी संभाजीराजे म्हणालेत.

हेही वाचा -

  1. आई वडिलांना सांभाळा अन्यथा मालमत्ता हातातून जाईल, विभागीय आयुक्तांनी काढले परिपत्रक
  2. Help Needed Elderly : वृद्धाश्रमांशिवाय राहिला नाही ज्येष्ठ नागरिकांना पर्याय; कौटुंबिक कलहामुळे एकच आधार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.