ETV Bharat / state

साताऱ्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत वाढविले निर्बंध - Satara update

सातारा जिल्ह्यात १ जूनपर्यंत निर्बंध वाढवले जाणार असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे.

जिल्ह्यात वाढवले निर्बंध
जिल्ह्यात वाढवले निर्बंध
author img

By

Published : May 16, 2021, 7:15 AM IST

सातारा - सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवले आहेत. या आदेशाची अमंलबजावणी न करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत वाढविले निर्बंध

कायदेशीर कारवाईचा इशारा

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास, अथवाविरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अनुसार तसेच भरतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ऑक्सिजनच्या ऑडीटसाठी तपासणी पथके

सातारा जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठ्याची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाया जावू नये, म्हणुन ऑक्सिजनचा कार्यक्षम वापरणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे प्राचार्य व प्राध्यापक यांची सेवा 28 एप्रिलच्या आदेशानुसार अधिग्रहीत करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नागरी व ग्रामीण क्षेत्रातील एकूण 86 रुग्णालयांसाठी 21 पथके नेमण्यात आली आहेत. तसेच उर्वरीत 8 नवीन मान्यता दिलेल्या रुग्णालयांचीही तपासणी करण्यात येणार आहे, असे पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी कीर्ति नलावडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - तौक्ती चक्रीवादळ : मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.