ETV Bharat / state

Beer Bar Permit Virawade : अजबच ! बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान बांधून देण्याची अट; विरवडे ग्रामपंचायतीचा कारभार - बियर बार परवानगीसाठी ग्रामपंचायतीला स्वागत कमान बांधून देणारा

बियरबारच्या परवानगीसाठी विरवडे (ता. कराड) या ग्रामपंचायतीने ( Beer Bar Permit Virawade Village ) गावाला स्वागत कमान बांधून देण्याची आणि प्रस्तावित बियरबारच्या जागेतून गावाला 20 फुटाचा रस्ता करून देण्याची अट घालून बारच्या परवानगीचा ठराव घेतला आहे. या सर्व बाबींचा उल्लेख ग्रामपंचायतीने प्रोसिडींगवर देखील घेतला आहे. त्यामुळे कराड परिसरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.

Beer Bar Permit Virawade
Beer Bar Permit Virawade
author img

By

Published : Jul 24, 2022, 3:05 PM IST

सातारा - ग्रामीण भागात बियरबार सुरू करायचा असेल तर संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असतो. अशाच एका बियरबारच्या परवानगीसाठी विरवडे (ता. कराड) या ग्रामपंचायतीने गावाला स्वागत कमान बांधून देण्याची आणि प्रस्तावित बियरबारच्या ( Beer Bar Permit Virawade Village ) जागेतून गावाला 20 फुटाचा रस्ता करून देण्याची अट घालून बारच्या परवानगीचा ठराव घेतला आहे. या सर्व बाबींचा उल्लेख ग्रामपंचायतीने प्रोसिडींगवर देखील घेतला आहे. त्यामुळे कराड परिसरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.

जादा अधिकाराचा गाव कारभार्‍यांकडून दुरूपयोग : ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रकारच्या कामांना परवानगी देण्याचे जादा अधिकारी अलिकडे ग्रामपंचायतींना मिळाले आहेत. त्यामुळे सरपंच व सदस्यांचे महत्व वाढले आहे. मात्र, गाव कारभारी अनेकदा नियमांच्या चौकटी मोडून शासनाने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करताना दिसतात. असाच कारनामा बिअरबारला परवानगी देताना पाहायला मिळाला आहे. ओगलेवाडीनजीकच्या विरवडे ग्रामपंचायतीने बियरबारला परवानगी देण्याचा ठराव मंजूर करताना गावची स्वागत कमान बांधून देण्याची आणि त्या मिळकतीतून रस्ता करून देण्याची अट घातली आहे. विरवडे ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या या झिंगाट कारभाराची जोरदार चर्चा आहे.

अटी-शर्तींचा प्रोसिडींगमध्येही उल्लेख : विरवडे ग्रामपंचायत धुंद कारभार प्रोसिडींगमध्येही पहायला मिळाला. बियरबारला परवानगीसाठी गाव कारभार्‍यांनी प्रस्तावकाला घातलेल्या स्वागत कमान आणि रस्ता करून देण्याच्या अटींचा प्रोसिडींगमध्ये उल्लेख केला आहे. त्यामुळे बियरबारला देण्यात आलेला परवानगीचा ठराव आता वादात सापडला असून विरवडे ग्रामपंचायतीचा अजब आणि तर्‍हेवाईक कारभार टिंगलीचा विषय बनला आहे.

जागा ओगलेवाडी गावठाणात अन् ठराव विरवडे ग्रामपंचायतीचा : वास्तविक ओगलेवाडी हे स्वतंत्र गावठाण आहे. 1975 सालीच त्याचे तसे गॅझेट झाले आहे. त्यानंतर कमी-जास्त पत्रक प्रसिद्ध होऊन ओगलेवाडीतील काही सर्व्हे नंबर त्याचवेळी विरवडे गावठाणामधून कमी करण्यात आले आहेत. प्रस्ताविक बियरबारसाठी मागणी केलेली जागा ओगलेवाडी गावठाणात येत असताना विरवडे ग्रामपंचायतीने परवानगीचा ठराव मंजूर केला आहे. यावरून आता दोन गावांच्या हद्दीचा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तारण जागेची ग्रामपंचायतीने उतार्‍याला केली नोंद : ज्या जागेत बियरबारला परवानगी देण्याचा ठराव घेण्यात आला आहे ती जागा 17 जून 2004 पासून एका कंपनीकडे तारण आहे. अशा जागेची नव्याने ग्रामपंचायतीने 8 अ ला नोंद कशी काय धरली? हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच बिअर बारला परवानगी मागणारी व्यक्ती ही परजिल्ह्यातील असताना त्या व्यक्तीचे गावच्या हद्दीतील वास्तव्य विरवडे ग्रामपंचायतीच्या कारभार्‍यांनी मान्य करून टाकले आहे.

ठराव करताना अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा : विरवडे आणि ओगलेवाडी गावांची स्वतंत्र गावठाणे आहेत. बिअरबारला परवानगी मागण्यात आलेली जागा ही ओगलेवाडी गावठाणात असताना विरवडे ग्रामपंचायतीने ठराव कसा घेतला, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार झाला असल्याची चर्चा सुरू आहे. विरवडे ग्रामपंचायतीने बियरबारला दिलेली परवानगी बेकायदेशीर असून त्या विरोधात कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे ओगलेवाडीचे माजी पोलीस पाटील मुकुंद पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - Smriti Irani IN Trouble : स्मृती इराणींच्या कुटुंबियांचा बेकायदेशीर कॅफे, गोव्यात राजकीय वातावरण तापले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.