ETV Bharat / state

महाबळेश्वरच्या ३०० फूट दरीतून युवकाला सुखरुप बाहेर काढण्यात ट्रेकर्सना यश - Mahableshwar

महाबळेश्वर - प्रतापगड घाटरस्त्यावर, सुमारे ३०० फुट दरीत तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी रविवारी सुखरूप बाहेर काढले. अमृत रामचंद्र रांजणे असे त्या युवकाचे नाव आहे.

महाबळेश्वरच्या ३०० फूट दरीतून युवकाला सुखरुप बाहेर काढण्यात ट्रेकर्सना यश

author img

By

Published : Sep 28, 2020, 7:12 AM IST

स‍ातारा : महाबळेश्वर - प्रतापगड घाटरस्त्यावर, सुमारे ३०० फुट दरीत तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी रविवारी सुखरूप बाहेर काढले. अमृत रामचंद्र रांजणे (वय ३५, रा. दिघी नवी मुंबई) असे त्या युवकाचे नाव असून तो रांजणी ता.जावळी गावचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृत दिघी नवीमुंबई येथील एका कंपनीत कामाला असून तो महाड येथे आपल्या कंपनीच्या सहकाऱ्यांसोबत कामानिमित्त आला होता. शनिवारी सुट्टी असल्याने दुपारी अमृत हा रांजणी ता जावळी येथे जाण्यासाठी पोलादपूर येथे आला. पोलादपूर येथून एका खासगी ट्रॅक्सने महाबळेश्वरकडे निघाला.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटरस्त्यावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी त्याने ट्रॅक्स थांबविण्यास सांगून तो उतरला. ज्या ट्रक्सने तो आला ती ट्रक्स तेथून निघून गेली मात्र हा युवक त्या ठिकाणी असलेल्या एका संरक्षक कठड्यावर बराच वेळ बसून होता. दरीत वाकून बघण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरला व तो थेट झाडाझुडपातून सुमारे ३०० फूट खोल दरीत घसरत गेला.

रात्री घाटरस्त्यावर अंधार, धुके असल्याने आवाज देऊन देखील त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मात्र रविवारी सकाळी या ठिकाणी एक पर्यटक दांपत्य ''सेल्फी'' घेत होते त्यांना ''वाचवा'' ''वाचावा'' असा आवाज दरीतून ऐकू आला. या दांपत्याने घाटरस्त्यावर असलेल्या फलकावरून महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली

या आधी देखील याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला जिवंत वाचविण्यात ट्रेकर्स जवानांना यश आले होते. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोरखंडाच्या सहाय्याने ट्रेकर्स कुमार शिंदे, संदीप जांभळे, जयवंत बिरामने, अमित कोळी यांनी खाली उतरण्यास सुरुवात केली. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर अमृतला दरीतून सुखरूप वर काढण्यात यश आले.

त्यानंतर पोलिसांनी अमृतच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हा युवक घसरून दरीमध्ये पडला कि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबतचा तपास महाबळेश्वर पोलीस करीत आहेत.

युवकाला वाचण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे, सुनीलबाबा भाटिया, सुनील वाडकर, दिनेश झाडे, नितीन वाडकर, अनिकेत वागदरे, मनीष झाडे आदींनी मदतकार्यात महत्वाची भूमिका बजावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.