ETV Bharat / state

300 रूपयांची लाच घेताना कराड तहसील कार्यालयातील रेकॉर्डरूम किपरला अटक

author img

By

Published : Feb 24, 2021, 5:09 PM IST

Updated : Feb 24, 2021, 8:18 PM IST

संशयीताने तक्रारदाराकडे 800 रूपयांची लाच मागितली होती. त्यातील 500 रूपये त्यांनी आदल्या दिवशी स्वीकारले होते. याची कबुली एसीबीच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

bribe
bribe

कराड (सातारा) - वारस नोंदीच्या फेरफार उतार्‍यासाठी तक्रारदाराकडून 300 रूपयांची लाच घेताना कराड तहसील कार्यालयातील रेकॉर्डरूम किपरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महेश्वर नारायण बडेकर, असे लाच घेणार्‍या संशयीताचे नाव आहे. दरम्यान, संशयीताने तक्रारदाराकडे 800 रूपयांची लाच मागितली होती. त्यातील 500 रूपये त्यांनी आदल्या दिवशी स्वीकारले होते. याची कबुली एसीबीच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

उतार्‍यासाठी 800 रूपयांची लाच

तक्रारदाराकडे संशयीत बडेकर याने फेरफार उतार्‍यासाठी 800 रूपयांची लाच मागितली होती. त्यातील 500 रूपये दि. 22 रोजी घेतले होते. मंगळवारी (दि. 23) रोजी उर्वरीत 300 रूपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस नाईक विनोद राजे, कॉ. संभाजी काटकर, नीलेश येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचेची रक्कम मोठी नसली, तरी एका गरीब व्यक्तीला पैशासाठी नाडविणार्‍या शासकीय कर्मचार्‍यावर केलेली कारवाई आनंद देणारी आहे, अशी प्रतिक्रिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अशोक शिर्के यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Last Updated : Feb 24, 2021, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.