ETV Bharat / state

कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीचे गुवाहाटीत सेलिब्रेशन, बंडखोर आमदारांनी केले शंभूराज यांचे अभिनंदन - शंभूराज देसाई शुभेच्छा एकनाथ शिंदे गट

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Rebel MLA congratulate Shambhuraj desai ) यांच्या नेतृत्वाखाली मरळी - दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (दि. 25) बिनविरोध झाली. या बिनविरोध निवडणुकीचे ( Eknath shinde group congratulate Shambhuraj desai ) शंभूराजेंसह गुवाहाटीत असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी ( Balasaheb Desai Sugar Factory election unopposed ) जोरदार सेलिब्रेशन केले.

Rebel MLA congratulate Shambhuraj desai
शंभूराज देसाई शुभेच्छा एकनाथ शिंदे गट
author img

By

Published : Jun 26, 2022, 11:00 AM IST

सातारा - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Rebel MLA congratulate Shambhuraj desai ) यांच्या नेतृत्वाखाली मरळी - दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (दि. 25) बिनविरोध झाली. या बिनविरोध निवडणुकीचे ( Eknath shinde group congratulate Shambhuraj desai ) शंभूराजेंसह गुवाहाटीत असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी ( Balasaheb Desai Sugar Factory election unopposed ) जोरदार सेलिब्रेशन केले. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदेंसह अन्य आमदारांनी शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

हेही वाचा - NCP in Satara is Unstable : महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे सातार्‍यातील राष्ट्रवादीत अस्वस्थता

देसाईंच्या गोटात दुहेरी यशाचा जल्लोष - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कारखान्याच्या निवडणुकीची अगोदरच रणनीती आखली होती. उमेदवार निश्चिती केली होती. स्वत:चा उमेदवारी अर्ज घेऊन भरून ठेवला होता. सूचक, अनुमोदकामार्फत तो भरला होता. तसेच, विरोधी पाटणकर गट विरोधात पॅनेल टाकणार नसल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे, निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकताच बाकी होती. ही संधी साधून त्यांनी आपला मुलगा यशराज याचे लाँचिंग केले. अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे, तरुण चेहर्‍याची सहकारात एन्ट्री आणि बिनविरोध निवडणूक, असा दुहेरी यशाचा जल्लोष शंभूराज देसाईंच्या गोटात साजरा होत आहे.

बंडखोर आमदारांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा - महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे, यासाठी बंड केलेल्या शिवसेना आमदारांनी गुवाहाटीत तळ ठोकला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पहिल्या दिवसापासून त्यांच्या समवेत आहेत. कारखाना निवडणुकीच्या प्रक्रियेवर त्यांचे तेथून लक्ष होते. शुक्रवारी सायंकाळी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. मुलाचे लाँचिंग आणि निवडणूक बिनविरोध, अशा दुहेरी यशाबद्दल बंडखोर आमदारांनी शंभूराज देसाईंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याचे फोटो देखील पाटणमधील समर्थकांनी व्हायरल केले आहेत.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : भिन्न विचारांचे लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत; उदयनराजेंचा उपरोधिक टोला

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.