ETV Bharat / state

कर्ज देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच व मोबाईल अ‌ॅप्सपासून रहा सावध; आरबीआयचा इशारा - आरबीआय नागरिक इशारा

आरबीआयने नागरिकांसाठी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. र्ज देण्याचे आश्वासन देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल अ‌ॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे.

RBI
आरबीआय
author img

By

Published : Jan 3, 2021, 1:02 PM IST

सातारा - लवकर व विना अडचण कर्ज देण्याचे आश्वासन देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल अ‌ॅप्सच्या आमिषांना अनेक जण बळी पडत आहेत. याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा कर्ज देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल अ‌ॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा भारतीय रिझर्व बँकेने दिला आहे.

अव्वाच्या सव्वा व्याज दर -

याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाने आरबीआयचे एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज दर व छुपे आकार मागितले जात आहेत. कर्ज वसुलीसाठी दडपशाही व चुकीच्या मार्गाचा अवलंबही केला जात आहे. कर्जदारांच्या मोबाईल फोन्सवरील डेटा मिळवण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याच्याही तक्रारी आहेत. आरबीआयकडे नोंदणी केलेल्या बँका, बँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्य सरकारकडून विनियमित केलेल्या इतर संस्थाच कायदेशीरपणे कर्ज देऊ शकतात, असे पत्रकात म्हटले आहे.

सावधानतेचा इशारा -

नागरिकांनी बेकायदेशीर संस्थांच्या आमिषांना बळी पडू नये. मोबाईल अ‌ॅप्सद्वारा कर्ज देऊ करणा-या कंपन्यांचा आणि संस्थांचा खरेपणा व पूर्वइतिहास पडताळून पहावा. याशिवाय, ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, अनधिकृत अ‌ॅप्सबरोबर कधीही शेअर करू नयेत. अशा अ‌ॅप्स आणि संबंधित बँक खात्यांची माहिती, कायदा अंमलबजावणी एजन्सीला कळवावी. किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा (https://sachet.rbi.org.in) उपयोग करावा.

'एनबीएफसी'ची नावे सुरुवातीलाच सांगा -

रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, बँका व एनबीएफसींच्यावतीने वापरण्यात येणा-या डिजिटल कर्ज देणाऱ्या प्लॅटफॉर्सनी, त्यांच्या ग्राहकांना बँकांची किंवा एनबीएफसीची नावे सुरुवातीलाच सांगावीत. रिझर्व्ह बँकेकडे नोंदणी केलेल्या एनबीएफसीची नावे व पत्ते आणि तक्रारी https://cms.rbi.org.in.या संकेत स्थळावर मिळवता येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.