ETV Bharat / state

अश्लील फोटो दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार ; गुन्हा दाखल - rape on married woman in satara

पती व मुलांस जीवे मारण्याची आणि अश्लील फोटो दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वकिलासह दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा
सातारा
author img

By

Published : Aug 13, 2020, 9:56 AM IST

सातारा - पती व मुलास जीवे मारण्याची आणि अश्लील फोटो दाखवण्याची धमकी देऊन विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वकिलासह दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद सदानंद लोंढे आणि अॅड. मंगेश चंद्रकांत पाटील ही आरोपींची नावे आहेत. या दोघांनी विवाहितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. 2008 पासून हा प्रकार सुरु होता. महिलेने पोलिसांत तक्रार देणार असे सांगितले, तेव्हा तुझीच बदनामी होईल, अशी भीती त्यांनी पीडित महिलेला घातली.

2013 मध्ये पीडितेचा पती रुग्णालयात उपचार घेत असताना मंगेश पाटीलने मदतीच्या बहाण्याने त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर महिलेने त्यास लोंढे याच्या गैरकृत्याबद्दल सांगितले. मंगेश पाटीलने आपण लोंढेला धडा शिकवुया, असे म्हणत गोड बोलुन महिलेला 2016 मध्ये एका हॉटेलमध्ये नेवून शितपेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकाराने खचून गेलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतरही मंगेश पाटील याने महिलेच्या घरी गळ्याला चाकू लावुन सलाईन लावलेल्या अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. वारंवार हा प्रकार घडत असल्याने संबंधित पीडित महिलेने अखेर शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात तक्रार दाखल केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.