ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात भिज पाऊस, बळीराजा सुखावला - rain news in marathi

कोरेगाव, फलटण, माण, खटाव हा परिसर दुष्काळी पट्टा समजला जातो. दरवर्षी या परिसरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. पण मागील दोन वर्षांपासून पाणी फाँऊडेशनच्या माध्यमातून या परिसरात जलसंधारणाची कामे झाली आहेत. लोकसहभागातून पाणी अडविण्याचे काम झाल्याने यंदाच्या वर्षी या परिसरात बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अशातच आर्द्रा नक्षत्राचा शेतीपूरक भिज पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

satara district farmers have happy for the rains
सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात भिज पाऊस, बळीराजा सुखावला
author img

By

Published : Jul 9, 2020, 10:06 AM IST

सातारा - यंदाच्या वर्षी पावसाळ्याचा सुरूवातीलाच, दुष्काळी पट्ट्यात बऱ्यापैकी मोसमी पाऊस झाला. मागील सात-आठ दिवसात झालेल्या दमदार पावसाने कोरेगाव, फलटण, माण, खटाव या परिसरातील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आला असून खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोरेगाव, फलटण, माण, खटाव हा परिसर दुष्काळी पट्टा समजला जातो. दरवर्षी या परिसरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. पण मागील दोन वर्षांपासून पाणी फाँऊडेशनच्या माध्यमातून या परिसरात जलसंधारणाची कामे झाली आहेत. लोकसहभागातून पाणी अडविण्याचे काम झाल्याने यंदाच्या वर्षी या परिसरात बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अशातच आर्द्रा नक्षत्राचा शेतीपूरक भिज पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

दुष्काळी पट्यातील या भागात कमी पाण्यात येणारी मूग, मटकी, बाजरी, कांदा, भुईमूग, मका ही नगदी पिके घेतला जातात. सद्या वेळोवेळी होणाऱ्या पावसाने दुष्काळी माण खटाव शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने, यावर्षी सिताफळ, आंबा, चिकू, पेरू अशा फळ बागा लागवडीकडेही माण-खटावमधील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

जिल्ह्यात 21 जून रोजी सूर्याने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला. वरूण मंडल योग असून नक्षत्र वाहन घोडा आहे. मंगळ, बुध, गुरू, शनी, नीर (पाणी) नाडीत असल्याने या नक्षत्राचा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्याचे पंचागकर्त्यांचे मत आहे. 5 जुलै रोजी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात आला आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून थोड्याफार प्रमाणात सर्वत्र पाऊस होईल असे भाकीत आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या पावसाने शेतकऱ्यामध्ये समाधानकारक वातावरण आहे. तर या पावसामुळे काही ठिकाणी पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात भिज पाऊस...

हेही वाचा - सातारा पालिका प्रशासनाची धुरा पहिल्यांदाच महिला अधिका-याच्या हाती; मुख्याधिकारीपदी श्रीमती गगे रुजू

हेही वाचा - आरोपीला अटक केली अन्... एका अधिकाऱ्यासह १३ कर्मचारी झाले होम क्वारंटाईन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.