ETV Bharat / state

साताऱ्यात जोरदार पाऊस, चारा छावण्यांना फटका

साताऱ्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे दुष्काळी भागात जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

पावसामुळे चारा छावण्यांचे झालेले नुकसान
author img

By

Published : Jun 11, 2019, 10:21 AM IST

सातारा - शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुष्काळी भागात जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्यावरील छते उडून गेली. तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले.

पावसामुळे चारा छावण्यांचे झालेले नुकसान

जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस तासभर सुरू होता. यामुळे बामनोली, रहिमतपूर, मेढा, पाचवड, नागठाणे, औंध याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुसरीकडे शहरातील घरांमध्ये पाणी शिरले होते तर रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले.

वादळी वाऱ्यामुळे दुष्काळी भागात जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्यावरील छते उडून गेली. यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट उभे राहिले आहे.

Intro:सातारा शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह तासभर झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तर जिल्ह्यातील बामनोली, रहिमतपुर, मेढा, पाचवड नागठाणे, औंध याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते जलमय झाले होते. तसेच दुष्काळी भागातील चारा छावण्या वरती देखील मोठे नुकसान झाले.

Body:जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्याचे पावसाने प्रचंड नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे जनावरांसाठी केलेली सावली छत उडुन नुकसान झाले आहे. सावलीसाठी असलेल्या शेडनेटची दुरुस्ती करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली, वाऱ्यामुळे अनेक मार्गावरील झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले. मात्र चारा छावणी वरती मोठे संकट कोसळले आहे. आधीच दुष्काळ त्यात आणखी वादळी वाऱ्याचा फटका. यामुळे जनावरांच्या सावलीचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

व्हिडिओ send whatsapp

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.