सातारा - मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. मी हतबल झालेलो नाही. बांगड्या भरलेल्या नाहीत, आता लढणारच आणि करून दाखवणार, असा सूचक इशारा खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिला. मला सकाळी शिवप्रताप दिनाची निमंत्रण पत्रिका ( Shiv Pratap Day Invitation Card ) मिळाली. तसेच मला कोणाचाही फोन आला नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
कोणीही फोन केला नाही - किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत सरकारच्यावतीने शिवप्रताप दिन जल्लोषात साजरा ( Shiv Pratap Day is celebrated with joy ) झाला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे ( Chhatrapati Shivaji Maharaj ) वंशज खासदार उदयनराजे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. यासंदर्भात बोलताना उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले की, कुणीही मला फोन केला नव्हता. शिवरायांचा केवळ नावापुरता, पुतळे बांधण्यापुरता वापर करणार का? असेही उदयनराजे म्हणाले.
जयंती, शिवप्रताप दिनाच्या तारखांचा घोळ - शिवाजी महाराजांबद्दल तारखांचा घोळ का? असा सवाल उदयनराजेंनी केला. १० नोव्हेंबरलाच शिवप्रताप दिन साजरा होतो. शिवजयंती ३ दिवस साजरी करतात, ही एकप्रकारे शिवरायांची अवहेलनाच नाही का? खरी शिवजयंती कुठली? असे परदेशातील लोक विचारतात, असे उदयनराजे म्हणाले.
अपमान करणाऱ्यांना राष्ट्रद्रोहाची शिक्षा द्या - महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना राष्ट्रद्रोहाची शिक्षा द्यावी, अशी मागणी करून उदयनराजे म्हणाले की, शिवरायांमुळे भारतात लोकशाही आहे. पहिला समाज, मग जात वगैरे आली. राज्यपालांसारखं उद्या कुणीही बोलेल. हा देश अखंड ठेवायचा असेल तर, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा मुख्य पाया आहे असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
नावापुरता शिवरायांचा वापर - राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचं धाडस कसं केलं. उद्या त्यांच्यापेक्षा मोठ्या पदावर असतील तेही बोलतील. मग केवळ नावापुरता, पुतळे बांधण्यापुरता शिवरायांचा वापर करणार का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.
शालिनीताईंकडून उदयनराजेंच्या मागणीचे समर्थन - महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्याखाली शिक्षा व्हावी, या उदयनराजेंच्या मागणीचे माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी एका पत्रकाद्वारे स्वागत केले आहे. अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांची भाजपने गांभिर्याने दाखल घ्यावी, अशी मागणी शालिनीताईंनी पत्रकात केली आहे.
लोढांचा कडेलोट करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगऱ्यातील सुटकेशी करणाऱ्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रतापगडावरून कडेलोट करा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी तोफ डागली आहे. अक्कल शून्य असलेल्या लोढा यांनी शेवटी इतिहासाबद्दल आपले अज्ञान दाखवलेच. आता तरी शिवप्रेमींनी एक होऊन अशा प्रवृत्तींना विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.