सातारा - आम्ही ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना मुख्यमंत्री क्लिन चीट देऊन वाचवत होते. मात्र, आता एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापल्याचे दिसते. प्रकाश मेहता यांच्याबाबत आम्ही केलेल्या गंभीर आरोपांची लोकायुक्तांनी चौकशी करून त्यांना दोषी ठरविले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीपदावरून हटवले. प्रकाश मेहतांच्या एमपी मिल्स प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर मांडावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केली.
अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठे मंदीची सावट आहे. अर्थव्यवस्थेचा विकास दरही मागील पाच वर्षांत सर्वात कमी नोंदवला गेला आहे. अर्थिक मंदीमुळे विकासदर कमी होत चालला आहे. त्यामुळे गुंतवणूक होत नाही. बेरोजगारी वाढत आहे. यावर्षी बेरोजगारीचे प्रमाण मागील 45 वर्षांतील सर्वाधिक आहे, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.