सातारा - निवडणुकांमुळे राज्यातील प्रकल्प गुजरातला देण्यात आला. आता कर्नाटकातमध्ये निवडणुका ( Karnataka election ) होत असल्याने सीमावर्ती गावेही सरकार ( Maharashtra Karnataka border dispute ) कर्नाटकाला देईल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ( Jayant Patil criticizes Shinde Fadnavis government ) केली. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्नाटकच्या मुद्द्यावर दिल्लीला जाण्यास विलंब होत आहे, पण त्यापूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जशास तसे उत्तर द्यायला हवे होते, असेही ते म्हणाले.
मंत्रीपद न मिळणाऱ्यांना भेट दिली जाईल - मंत्रीमंडळ विस्ताराची जवळपास तयारी झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार कधीही होऊ शकतो. परंतु, ज्यांना मंत्री पद मिळणार नाही. त्यांना आणखी एक भेट देऊन शांत बसवले जाईल, असे खोचक उत्तर आमदार जयंत पाटील यांनी दिले.
तीन आठवडे अधिवेशन चालवा - हिवाळी अधिवेशन तीन आठवडे चालवले जावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, हे सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या भूमिकेत दिसत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने नवीन जलयुक्त शिवार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना आमच्या सरकारचीच संकल्पना होती. या योजनेवर बरेच आरोप झालेले आहेत. त्याची चौकशी करण्याची वेळ देखील आली होती. त्यामुळे नवीन येणारी संकल्पना पारदर्शी कशी असेल, याची काळजी घेण्याचा सल्ला जयंत पाटील यांनी दिला आहे.