ETV Bharat / state

पैसे फेडूनही जबरदस्ती मोटारसायकलवर ताबा; खासगी सावकारास अटक - खासगी सावकाराला अटक कराड न्यूज

कराडमधील अन्य खासगी सावकारही पोलिसांच्या रडावर आहेत. खासगी सावकाराकडून पिळवणूक होत असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन गोडसे यांनी केले आहे.

private-money lender-arrested in karad
पैसे फेडूनही जबरदस्ती मोटारसायकलवर ताबा; खासगी सावकारास अटक
author img

By

Published : Mar 17, 2021, 7:19 PM IST

Updated : Mar 17, 2021, 8:07 PM IST

कराड (सातारा) - एका खासगी सावकाराने पैशासाठी मारहाण करून एकाची मोटरसायकल जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सावकाराला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याल दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अजिंक्य शंकर हुकिरे, असे त्या खासगी सावकाराचे नाव आहे.

जबरदस्तीने मोटारसायकलवर ताबा
फिर्यादीने 2020 मध्ये हुकिरे याच्याकडून 20 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात जानेवारी 2021 पर्यत 26 हजार रूपये सावकाराला परतही दिले आहेत. तरी देखील सावकार फिर्यादीकडे आणखी 20 हजार रूपयांची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीला मारहाण करून त्याची मोटारसायकल सावकाराने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती.

अन्य खासगी सावकारही पोलिसांच्या रडावर

याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी अजिंक्य शंकर हुकिरे या खासगी सावकारास अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान, कराडमधील अन्य खासगी सावकारही पोलिसांच्या रडावर आहेत. खासगी सावकाराकडून पिळवणूक होत असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन गोडसे यांनी केले आहे.

Last Updated : Mar 17, 2021, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.