ETV Bharat / state

पृथ्वीराज चव्हाणांनी मंजूर केलेल्या विश्रामगृहाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन - विश्रामगृहाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१३ मध्ये विश्रामगृहाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यांना मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाची संधी मिळाली नाही. मात्र, सातारा जिल्ह्याचेच सुपूत्र असलेल्या एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होत असल्याने हा कार्यक्रम पक्षातीत ठरणार आहे.

guest house
guest house
author img

By

Published : Nov 24, 2022, 8:48 PM IST

सातारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी कराडमधील नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन होत आहे. तब्बल २२ कोटी २२ लाख रूपये खर्चून बांधण्यात आलेले नवीन विश्रामगृह एखाद्या अलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१३ मध्ये विश्रामगृहाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यांना मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाची संधी मिळाली नाही. मात्र, सातारा जिल्ह्याचेच सुपूत्र असलेल्या एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होत असल्याने हा कार्यक्रम पक्षातीत ठरणार आहे.

ग्रामीण भागातील सर्वात भव्य विश्रामगृह - पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी नवीन विश्रामगृहाला मंजुरी दिली होती. बांधकामाला तब्बल २२ कोटी २२ लाख रूपये खर्च झाला आहे. सर्व सोयीसुविधा असलेले हे विश्रामगृह एखाद्या अलिशान हॉटेलसारखे असून ग्रामीण भागात एवढे भव्य असणारे हे राज्यातील एकमेव विश्रामगृह आहे. जुन्या विश्रामगृहाची देखील डागडुजी करण्यात आली आहे.

विश्रामगृहाचा पांढरा हत्ती पोसणार कोण? - अतिभव्य असलेल्या या विश्रामगृहाचा देखभाल दुरुस्ती खर्च मोठा असणार आहे. त्यामुळे खासगी व्यक्तीला विश्रामगृह चालविण्यास दिले जाणार आहे. काम पूर्ण होऊन चार वर्षे झाली तरी उद्घाटनाअभावी विश्रामगृह बंद होते. उद्घाटन झाल्यानंतर त्याचा वापर सुरू होईल. तथापि, विश्रामगृह चालवायला घेण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.

कराडची वाटचाल जिल्ह्याकडे - कराडला जिल्हा व्हावा, अशी मागणी काही वर्षांपासून जोर धरत असताना पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कराडला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर केले. प्रशासकीय इमारतीला निधी दिला. भव्य विश्रामगृह निर्माण केले. जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण केल्या. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कराड जिल्हा निर्मितीसाठी सहकार्य करतात का, याची कराडकरांना उत्सुकता असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.