सातारा - देशाच्या राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) यांची निवड झाल्यानंतर सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ऐतिहासिक सातारा नगरीला अवश्य भेट देईन, असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उदयनराजेंना दिले.
-
भारताच्या नवनिर्वाचित महामहिम राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. त्यानिमित्त नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/fCPUP2PwYz
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भारताच्या नवनिर्वाचित महामहिम राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. त्यानिमित्त नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/fCPUP2PwYz
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 23, 2022भारताच्या नवनिर्वाचित महामहिम राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. त्यानिमित्त नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/fCPUP2PwYz
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 23, 2022
आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाचा मान - भारताच्या राष्ट्रपती होणार्या द्रौपदी मुर्मू या केवळ दुसर्या महिला आहेत. आदिवासी समाजातील मुर्मू यांची भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. सर्वोच्च पदावर विराजमान होणार्या त्या पहिल्या आदिवासी महिला असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचे प्रतिक असलेल्या राजमुद्रेची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींचा सन्मान केला.
ऐतिहासिक सातार्याला भेट देण्याचे राष्ट्रपतींना निमंत्रण - छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या सातारा नगरीत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सामाजिक परिवर्तनासाठी सर्वस्व पणाला लावले होते. रयतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. विशेषतः महिलांच्या शिक्षणाची सातार्यात सोय केली. अशा याऐतिहासिंक सातारा नगरीला आपण आवश्य भेट द्यावी, अशी विनंती करून राष्ट्रपतींना सातारा भेटीचे निमंत्रण दिले.
हेही वाचा - Draupadi Murmu : नगरसेविका ते देशाच्या प्रथम नागरिक; वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राजकीय प्रवास