सातारा - ट्रान्समिशन लाईनच्या नियोजित कामामुळे कोयना धरणाचा ( Koyna Dam ) पायथा वीजगृह शनिवारी सकाळी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ( Power supply to Koyna Dam shut down ) पुर्वेकडे सिंचनाची मागणी आल्याने दुपारी २ वाजता कोयना धरणाचा एक वक्र दरवाजा १ फुटाने उघडून ११०० क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात ( Water from Koyna Dam was released into the river ) आले आहे.
ऑक्टोबरपर्यंत धरणातून सुरू होता विसर्ग - यंदा दीर्घ काळ पाऊस पडला. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत उघडलेले होते. त्यानंतर दोनच दरवाजे उघडे ठेऊन विसर्ग सुरू होता. १७ ऑक्टोबर रोजी दोन दरवाजे बंद करण्यात आले तर २१ ऑक्टोबर रोजी पायथा वीजगृहातील विसर्ग पुर्णपणे बंद करण्यात आला होता.
तांत्रिक कामामुळे धरणाचा दरवाजा उघडला - ट्रान्समिशन लाईनच्या नियोजित कामामुळे कोयना धरणाचा पायथा वीजगृह बंद करून धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. दरवाजातून ११०० क्युसेक्स पाणी पुर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. आजमितीस धरणात ९५.२६ टीएमसी (९१.५१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ६५७ मीटर आहे.