सातारा: बारामती-कोल्हापूर एसटी बसमध्ये अल्पवयीन तरूणीचा विनयभंग (minor girl molestation) केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा (Pocso on Kabaddi player) दाखल झालेला कोल्हापूर पोलीस दलातील (Policeman booked under Pocso) खेळाडू महेश मगदूम हा अष्टपैलू कबड्डीपटू आहे. तसेच २०१८ साली तो बेंगळुरू बुल्स संघातून (Bengaluru Bulls Kabaddi team) खेळला होता. ८ लाख रूपयांत त्याला बेंगळुरू बुल्स संघाने खरेदी केले होते. (latest news from Satara), (Satara Crime)
कोल्हापूर पोलीस दलात खळबळ - स्पोर्टमन असलेल्या सहाय्यक फौजदार महेश मारूती मगदूम यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे समजताच कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याला लवकर पदोन्नती देखील मिळालेली आहे. अष्टपैलू कबड्डीपटू म्हणून त्यांचा लौकीक असून ते राष्ट्रीय खेळाडू आहे. खेळाडू असलेल्या पोलिसावर पोक्सोचा गुन्हा दाखल होणे ही बाब कोल्हापूर पोलीस दलासाठी लाजिरवाणी ठरली आहे.
प्रो-कबड्डी लीगमधील अष्टपैलू खेळाडू - महेश मगदूम हा २०१८ मध्ये प्रो-कबड्डी लीगमध्ये बेंगळुरू बुल्स संघातून कबड्डीचे सामने खेळाला होता. संघाच्या मालकाने त्याला ८ लाख रूपयांत खरेदी केले होते. याच संघात कासेगाव (जि. सांगली) येथील काशिलिंग आडके हा देखील त्याचा संघ सहकारी होता. बेंगळुरू बुल्स संघाचा तो अष्टपैलू खेळाडू होता. पवनकुमार, आशिष सांगवान, रोहित कुमार अशा दिग्गज खेळाडूंसमवेत त्याने प्रो-लीगमध्ये कबड्डीचे अनेक सामने गाजवले होते.
सातार्यातील क्रीडा स्पर्धेला गालबोट - सातार्यात १२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान ४८ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. १७) या स्पर्धेचा समारोप होता. त्याच दिवशी अष्टपैलू कबड्डीपटू असलेल्या महेश मगदूम याच्यावर अल्पवयीन युवतीच्या विनयभंगप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने क्रीडा स्पर्धेला एकप्रकारे गालबोल लागले. सातारहून कोल्हापूरला जात असताना एसटी बसमध्ये विनयभंगाचा प्रकार घडला. या संदर्भात तरूणीने कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा फिर्याद दिली. हा प्रकार वळसे ते काशिळ या दरम्यान घडला असल्याने तपासासाठी हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.