ETV Bharat / state

वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात - सातारा गुन्हे बातमी

मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उभ्या एका वाहनचालकाला चाकुचे धाक दाखवत लुटण्यात आले होते. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवून दोन आरोपीला अटक केले असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

मुद्देमाल व आरोपीसह पोलीस पथक
मुद्देमाल व आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Nov 26, 2020, 3:00 AM IST

सातारा - वाढे फाट्याजवळ महामार्गाच्या सेवा रस्त्याजवळ थांबलेल्या माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन तीन हजारांची रोकड व मोबाईल तिघांनी लुटून नेला. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी काही तासातच या गुन्ह्यातील दोघांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

अधिक अंकुश पवार (वय 27 वर्षे), सुयश अशोक जाधव (वय 19 वर्षे, दोघेही रा. सैदापूर, ता. सातारा) अशी घटक केलेल्या संशयितांची नावे आहेत तर एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी लुटले

याबाबत सविस्तर वृत्त असे, मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) रात्री पुणे-बंगळुरू महामार्गावर वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावर एक वाहन थांबलेले होते. मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी युवकांनी वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच तीन हजारांची रोकड व मोबाईल हिसकावून पोबारा केला.

संशयितांकडून गुन्ह्याची कबुली

वाहन चालक अविनाश किसन शेळके (रा. बिरोबावस्ती, लोणंद) यांनी सातारा तालुका पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी कौशल्याने तपास करुन एका संशयितास ताब्यात घेतले. त्याने दोन साथीदारांबरोबर हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी इतर दोघांनाही ताब्यात घेतले. गुन्ह्यातील लुटलेली रोकड, वापरलेले शस्त्र व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

हेही वाचा - केसे-वारूंजी गावातील शंभर एकर ऊस आगीत जळून खाक; कोट्यवधींचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.