ETV Bharat / state

खंडाळ्यातील पाणी परिषदेत खासदार नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेकीचा कट - दिगंबर आगवणे

"फलटण तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने पुणे जिल्ह्यातील काही गुंडांना सुपारी देवून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ही परिषद उधळून लावण्याची सुपारी दिली होती." अशी माहिती दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर
author img

By

Published : Jul 18, 2019, 11:01 PM IST

सातारा - "खंडाळा येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या पाणी परिषदेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेक करुन पाणी परिषद उधळून लावण्याचा कट फलटणमधील एका ज्येष्ठ नेत्याने केला होता. मात्र, अगोदरच या दगडफेकीची कुणकुण लागल्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर पाणी परिषदेस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी खळबळजनक माहिती फलटण येथील स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

गेली १९ वर्षे सातारा जिल्ह्याच्या हक्काचे ७० टीएमसी पाणी बारामतीला केवळ आपले पद वाचविण्यासाठी फलटणमधील काहींनी खंडाळा आणि फलटण तालुक्यातील जनतेची मोठी प्रतारणा केली असल्याचे पाणी परिषदेच्या आयोजकांनी सांगितले. त्यामुळे खंडाळा येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी पुढे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आयोजीत केलेल्या पाणी परिषदेला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर येणार होते. मात्र, खासदारांविरोधात कट रचला असल्याने ते येऊ शकले नसल्याचा गौप्यस्फोट आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. पाणी परिषदेला उपस्थित असलेल्या नाईक-निंबाळकर उपस्थित राहिले नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

"फलटण तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने पुणे जिल्ह्यातील काही गुंडांना सुपारी देवून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ही परिषद उधळून लावण्याची सुपारी दिली होती." अशी माहिती दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Intro:सातारा -खंडाळा येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या पाणी परिषदेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेक करुन ही पाणी परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न फलटणमधील एका ज्येष्ठ नेत्याने केलेला होता. मात्र, अगोदरच या दगडफेकीची कुणकुण लागल्याने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर या पाणी परिषदेस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी खळबळजनक माहिती फलटण येथील स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Body:गेली 19 वर्षे सातारा जिल्ह्याच्या हक्काचे 70 टीएमसी पाणी बारामतीला केवळ आपले पद वाचविण्यासाठी फलटणमधील काही नतद्रष्टांनी खंडाळा व फलटण तालुक्यातील जनतेची मोठी प्रतारणा केली आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी खंडाळा येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षपदी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे होते. तसेच माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, पाणी पंचायतीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब बागवान, उपाध्यक्ष एस. वाय. पवार, शंकरराव गाढवे, नानासाहेब राणे, बकाजीराव पाटील, पुरुषोत्तम जाधव, नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, रमेश धायगुडे, उपसभापती वंदना धायगुडे, राजेंद्र नेवसे, डॉ. विजय शिंदे, कॉंग्रेस युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रदीप माने या परिषदेला उपस्थित होते. मात्र, पाणी परिषदेचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मात्र ऐनवेळी या पाणी परिषदेला अनुपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे पाणी परिषदेला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित राहिले नाहित म्हणून संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र फलटण तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने पुणे जिल्ह्यातील काही गुंडांना सुपारी देवून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ही परिषद उधळून लावण्याची सुपारी दिली होती. मात्र, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना याबाबत होणार्‍या दगडफेकीची पूर्वसूचना मिळाल्यामुळे पाणी परिषद व्यवस्थित पार पडावी तसेच पाणी परिषदेला उपस्थित राहिलेल्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी खंडाळा येथे झालेल्या पाणी परिषदेला उपस्थिती लावली नाही, अशी खळबळजनक माहिती युवानेते दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटणमधील वातावरण दूषित करण्यात येत आहे. आपले पद आणि खुर्ची टिकवण्यासाठी फलटणमधील काही ज्येष्ठ नेत्यांचे राजकारण खालच्या पातळीवर उतरलेले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून नीच पातळीवर जावून राजकारण केले जात आहे. खंडाळा येथेसुद्धा फलटण मधील ज्येष्ठ नेत्याकडून माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेक करुन पाणी परिषद उधळून लावण्याचा कट रचला गेला होता. मात्र, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पाणी परिषदेला अनुपस्थिती दर्शविल्याने होणारा अनर्थ टळला आहे. मात्र, अशी नीच कृत्ये करणार्‍या फलटण नरेशांना पोलीस प्रशासनाने हिसका दाखवून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.