कराड (सातारा) - सर्पदंशापाठोपाठ काविळ आणि कोरोना रुग्णांवर प्रतिबंधक औषध म्हणून वापरण्यात आलेल्या पिनाक (Pinak medicine) या औषधाची आता एचआयव्हीग्रस्तांवरही चाचणी सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयासह कराड येथील दोन केंद्रांवर एचआयव्हीग्रस्त रूग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. या चाचणीला केंद्र सरकारच्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाकडून (सीटीआरआय) परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पिनाक औषधाचे (Pinak medicine) संशोधक आणि ससून रूग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एस. पवार यांनी दिली.
Pinak medicine for snake bite : पिनाक औपधाची एचआयव्हीग्रस्तांवर चाचणी - snake venom news
पिनाक (Pinak medicine ) या औषधाची उपयुक्तता समोर आल्यानंतर केंद्र सरकारच्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाने (सीटीआरआय) तसेच पुण्याच्या रॉयल पुणे इंडिपेंडंट एथिकल कमिटीने एचआयव्ही आणि काविळ रूग्णांवरील चाचणीला परवानगी दिली आहे.