सातारा - पाटण तालुक्याच्या विविध विभागात पुणे, मुंबई, कराड येथून आलेल्या १८ जणांविरोधात साथरोग प्रतिबंध कायदा अनुषंगाने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाटणच्या पोलीस अधिकारी तृप्ती सोनवणे यांनी दिली.
अडुळ, मोरगिरी, केरळ, येराड, कुसरुंड, काठी, अवसरी , मेंढोशी, नवारस्ता, पांढरवाडी, तेलेवाडी गावचे पोलीस पाटील हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना खालील व्यक्ती आढळून आल्या. यात मोजे अडूळ येथील पोलीस पाटील राहुल सत्रे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना युवराज महादेव शिंदे (वय ४२ मुळ राहणार कोरीवळे ता पाटण) हे पुणे येथून अडूळ गावठाण येथे, तर संदेश मारुती शिर्के (वय २४), अक्षय मारुती शिर्के ( वय २५ मुळ राहणार अडुळपेठ ता पाटण) हे पुणे येथून अडूळ गावठाण येथे आले आहेत. मोरगिरी येथील पोलीस पाटील पुनम कुंभार हे पेट्रोलिगं करत असताना त्यांना समिर यशवंत सरनोबत (वय २८ राहनार मोरगिरी) हे ठाणे येथून मोरगिरी येथे तर केरळ येथील पोलीस पाटील महेश कुभांर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना प्रदीप विलास कुभांर (वय ३५ राहनार केरळ) हे ठाणे येथून तर येराड येथील पोलीस पाटील रविद्रं पाटील हे पेट्रोलिंग करीत असताना शिवाजी रामचंद्रं साळुंखे (वय ४० रा येराड) हे मुबंई येथून आले होते.
कुसरुंड येथील पोलीस पाटील अनिल सुतार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना योगेश उत्तम मोहीते (वय २७ रा .कळकेवाडी) हे मुंबई येथून आले आहेत. काठी येथील पोलीस पाटील सुभाष शिर्के हे पेट्रोलिंग करत असताना सुरेश गणपत जाधव (वय ५०) हे कराड येथून काठी येथे आले. तर मेढोशी येथील पोलीस पाटील भरत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना संतोश खाशाबा जाधव (वय ३५), प्रविण संतोष जाधव (दोन्ही रा केरळ) हे मुंबई येथून केरळ येथे आले. तर, नाडे येथील पोलीस पाटील सचिन भिसे पेट्रोलिंग करत असताना तात्यासो आनंदा पवार (वय ३५), निता तात्यासो पवार (वय ३०) हे मुंबई येथील मानपाडा येथून नवारस्ता येथे आले.
पांढरवाडी येथील पोलीस पाटील निलेश पाटील हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अमर महादेव भिसे (वय २३), सुभाष संभाजी पाटील (वय ३४), सुषमा सभांजी पाटील (५०) हे मुंबई येथून पांढरवाडी येथे आले, तर, कोरीवळे येथील पोलीस पाटील दादासो शिदें हे पेट्रोलिंग करत असताना अक्षय वसंत शिंदे (वय २२), वैभव किसन शिंदे (वय २७), युवराज महाराज शिंदे (वय २७) हे पुणे येथून कोरिवळे येथे आले आहेत.
वरील सर्वजण अज्ञात वाहनाने आले असल्याचे पोलीस पाटील यांनी कळवले. त्यानंतर त्या त्या ठिकाणी जावून चोकशी केली असता, वरील सर्वांवर संचारबंदीचे उल्लघंन केल्याचे समोर आले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदे अन्वये पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करत आहेत.