सातारा - जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडींचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. काही अपवाद वगळता जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - नववर्षाचे उत्साहात स्वागत, मुंबईकरांचा जल्लोष
सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा वरचष्मा
पंचायत समिती निहाय नवे कारभारी पुढीलप्रमाणे - (पंचायत समितीचे नाव, सभापती व उपसभापती)
- सातारा : सविता इंदलकर, अनिल जाधव (शिवेंद्रराजे गट)
- जावळी : जयश्री गिरी, सौरभ शिंदे (दोघेही राष्ट्रवादी)
- कराड : प्रलव ताटे (राष्ट्रवादी), रमेश देशमुख (उंडाळकर गट)
- वाई : संगिता चव्हाण, विक्रांत उर्फ भैया डोंगरे (दोघेही राष्ट्रवादी)
- कोरेगाव : राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे (दोघेही राष्ट्रवादी)
- फलटण : शिवरुपराजे खर्डेकर- निंबाळकर, रेखा खरात (दोन्ही राष्ट्रवादी)
- पाटण : राजाभाऊ शेलार, प्रतापराव देसाई (दोघेही राष्ट्रवादी)
- माण : कविता जगदाळे (शिवसेना), तानाजी कट्टे (राष्ट्रवादी)
- खटाव : रेख घार्गे, आनंदराव भोंडवर (दोन्ही राष्ट्रवादी)
- महाबळेश्वर : अंजना कदम, संजूबाबा गायकवाड (दोघेही राष्ट्रवादी)
- खंडाळ : राजेंद्र तांबे (राष्ट्रवादी), वंदनाताई धायगुडे पाटील (काँग्रेस)