सातारा - लोणंद येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉईज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू करण्यात आला. या प्लांटचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख्य उपस्थितीत, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, धिरज चंद्रा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदिप राऊत आदी उपस्थित होते.
हेही वाचा - साताऱ्यातील मेरुलिंग घाटात कार कोसळून 3 ठार ; 5 जखमी
रोज 1500 सिलेंडर
सोना अलॉईज ही पोलाद निर्मितीची कंपनी असून येथील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आला. या ऑक्सिजन प्लांटमधून रोज ऑक्सिजनचे 1 हजार 500 सिलेंडर भरले जातील. यामुळे जिल्ह्याची बहुतांशी ऑक्सिजनची गरज पुरविण्यास मदत होणार आहे. यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्याची गरज भागेल
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या प्लांटच्या माध्यमातून लवकरच जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यात येणार, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
हेही वाचा - सातारा-कागल महामार्गाच्या सुधारणेसाठी 558 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर