सातारा - फलटण येथे ३२ व्या राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन ( Organized National Kho Kho Tournament at Phaltan ) करण्यात आले आहे. माजी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलात २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत ३० राज्यांमधील ६० संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ३० मुलांचे आणि ३० मुलींचे संघ असतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे ( Maharashtra State Kho Kho Association ) अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.
फलटणला खेळाची ऐतिहासिक परंपरा - फलटणला खो-खो खेळाची ऐतिहासिक परंपरा आहे. खो-खोची पंढरी म्हणूनच फलटणला ओळखले जाते. राज्यासह देशामधील खो-खो खेळातील बहुतांश खेळाडू व शिक्षक हे फलटणशी संबंधित आहेत. यापुर्वी फलटणला राष्ट्रीय व राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे सामने झालेले आहेत. माजी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलातील क्रीडांगणावर प्रेक्षकांसाठी भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.