ETV Bharat / state

साताऱ्यात निकट सहवासीत निघाला कोरोनाग्रस्त; शहरात 8 तर जिल्ह्यात 93 बाधीत - क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय

सातारा शहरात आज ‍आणखी एक कोरोनाबाधीत निष्पन्न झाला असून शहारातील बाधितांचा आठवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 93 झाली आहे.

शासकीय रुग्णालय सातारा
शासकीय रुग्णालय सातारा
author img

By

Published : May 7, 2020, 11:56 AM IST

सातारा - शहरात आज ‍आणखी एक कोरोनाबाधीत निष्पन्न झाला. तो प्रतापगंज पेठेतील बाधीत‍ाचा निकटचा सहवासित आहे. चार बंदीवानांसह सातारा शहरातील बाधितांचा आकडा 8 पर्यंत पोहचला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 93 झाली आहे.

एप्रिलमध्ये मुंबईहून आलेला 27 वर्षीय युवक बाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. 1 मे रोजी त्याचा अहवाल आल्याने शहरात चिंता वाढली होती. त्याचाच निकट सहवासित एक महिला बाधीत असल्याचे आज निष्पन्न झाले. सातारा शहरात बाधितांची एकूण संख्या 8 झाली आहे. यापुर्वी सदरबझारमध्ये एक महिला, शनिवार पेठेत एक महिला आणि प्रतापगंज पेठेत तरुणांसह एक महिला बाधीत आढळले आहेत. शिवाय पुण्याच्या येरवडा कारागृहातून आलेल्यांपैकी 4 कैदी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बुधवारी (दि.6 मे) रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 7, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 102, उपजिल्हा रुग्णालय फलटण 21 असे एकूण 130 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात सातारा व कराडमध्ये 79 बाधीत उपचार घेत आहेत. 14 जण कोरोनामुक्त होवून घरी गेले. तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यु झ‍ाला आहे. 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 1, कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज मधील 11, कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 1 व फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात येथील 10 असे एकूण 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.

हेही वाचा - साताऱ्यात 'सारी'ने दोघांचा मृत्यू; तर कोरोना अद्याप प्रलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.