ETV Bharat / state

खटावमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी, साताऱ्यातील मृतांची संख्या तेरा

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आता खटाव तालुक्यातील आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आंभोरी येथील 53 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष मुंबई येथून प्रवास करुन आला होता.

 corona patient died in satara
साताऱ्यात कोरोनाचा आणखी एक बळी
author img

By

Published : May 28, 2020, 9:30 AM IST

सातारा - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आता खटाव तालुक्यातील आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आंभोरी येथील 53 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष मुंबई येथून प्रवास करुन आला होता. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आता जिल्ह्यातील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला आहे.

अंभोरी येथील रुग्णाला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला तीव्र श्वसनदाह आजार होता. उपचारादरम्यानच या रुग्णाचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या भाटकी येथील आणखी एका 54 वर्षीय कोरोना संशयित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. 19 मे पर्यंत हा आकडा 2 होता. गेल्या आठ दिवसात 11 जणांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 255 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

172 जणांचे नमुने तपासणीला -

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालयातील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 27, ग्रामीण रुग्णालय वाई 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 68, उपजिल्हा रुग्णालय फलटण 7 असे एकूण 172 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.