ETV Bharat / state

पाचवड फाट्याजवळ दोन दुचाकींची धडक, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - सातारा जिल्हा बातमी

कराड-चांदोली मार्गावरील पाचवड फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

अपघात
अपघात
author img

By

Published : Mar 10, 2021, 7:30 PM IST

कराड (सातारा) - कराड-चांदोली मार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) हद्दीतील साई मंगल कार्यालयासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.

राजेंद्र यशवंत शेटे (वय 49 वर्षे, रा. येळगाव, ता. कराड), असे मृताचे नाव असून जखमीचे नाव समजू शकले नाही. राजेंद्र शेटे हे दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून कराडकडे येत होते. पाचवड फाटा हद्दीतील साई मंगल कार्यालयासमोर त्यांच्या दुचाकीची आणि समोरून आलेल्या दुचाकीसह समोरा-समोर धडक झाली. या अपघातात राजेंद्र शेटे यांचा जागीच मृत्यू झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

हेही वाचा - डोळ्यात मिरचीपूड टाकून दांडक्याने शिक्षकाला जबर मारहाण; चौघांवर गुन्हा

हेही वाचा - सातारा : पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील नवीन पुलासाठी 45 कोटींची तरतूद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.