सातारा - राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री आमदार शंभूराज देसाईंचा ( Satarya Guardian Minister MLA Shambhuraj Desai ) आज वाढदिवस ( Birthday of MLA Shambhuraj Desai today ) असून त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी मंत्रीमंडळातील शिंदे गटाचे उदय सामंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि संदीपान भुमरे हे चार मंत्री आज पाटण दौर्यावर आहेत. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, या डॉयलॉगमुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील मंत्र्यांसोबत मरळी कारखान्यावरील संगीत रजनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मराठी कलाकारांचा संगीत रजनी कार्यक्रमपालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त मरळी-दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलारांचा सहभाग असलेल्या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी कलाकांरांची उपस्थीती - या कार्यक्रमात सिध्दार्थ चांदेकर, अभिनय बेर्डे, पूजा सावंत, नेहा पेंडसे, भार्गवी चिरमुले, ऐश्वर्या बडदे, हीना पांचाळ यांच्यासह महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी, गौरव मोरे, वनिता खरात, गायक राहूल सक्सेना यांचा सहभाग आहे. शिंदे गटातील चार मंत्री आणि आमदार शहाजीबापू हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. खा. उदयनराजेंनी दिल्या शुभेच्छापालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिनी खासदार उदयनराजे भोसले यांनी मरळी कारखान्यावर जाऊन सकाळी मंत्री देसाईंना शुभेच्छा दिल्या.
उदयनराजे, शंभुराजे यांच्यातील मैत्री जिल्ह्याला परिचित आहे. उदयनराजेंनी आपल्या समर्थकांसोबत जाऊन शंभुराजेंना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कारखाना कार्यस्थळावर हेलिपॅडची देखील सोय करण्यात आली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) हे शासकीय विमानाने कराड विमानतळावर येणार आहेत.
कराडमधून ते मोटारीने मरळीला जाणार आहेत. रात्री ते मोटारीने रत्नागिरीला जाणार आहेत. रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे ( Minister Sandipan Bhumre ) हे खासगी हेलिकॉप्टरने येणार असून ते थेट मरळी येथील हेलिपॅडवर उतरणार आहेत. तसेच रात्री त्यांचा कराडमध्ये मुक्काम आहे.