ETV Bharat / state

राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने

भारत सरकार सगळ्यांनाच सीएएद्वारे पुरावे मागत आहे. तो महार‍ाजांनाही मागितला जाईल आणि मलाही मागितला जाईल. जर महाराष्ट्र शासनाने हा कायदा राज्यात लागू केला तर मला आणि संपूर्ण प्रजेला नागरिकत्व सांगणारा पुराव्याचा कागद घेऊनच पळावे लागेल, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सीएए, एनआरसी कायद्यावरून सरकारवर केली.

माजी आमदार लक्ष्मण माने
माजी आमदार लक्ष्मण माने
author img

By

Published : Jan 18, 2020, 6:30 PM IST

सातारा - 'राजा हा राजा आहे, त्याला कोण पुरावा मागणार त्याला पुरावा मागू नका, हे प्रजा म्हणून आम्ही कसे म्हणणार? तरीही राजाला पुरावा मागितलाच आहे तर त्यांनी तो द्यावा; विषय संपला', अशा शब्दात माजी आमदार, 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राजघराण्यासंदर्भातील वादात उडी घेतली.

बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने

छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान मोदी यांच्यातील तुलनेवरुन निर्माण झालेल्या वादाने वेगळे वळण घेतले आहे. खासदार राऊत यांच्या निषेधार्थ गुरुवारी साताऱ्यात बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. माने म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी राजघराण्यातील वंशजांना पुरावा मागितला तर त्यात चुकीचे काय आहे. पुरावा मागितला म्हणजे दिलाच पाहिजे अस तर काही ना. दोघे परस्परांवर बोलत आहेत, त्यांचा आपसातचा हा वाद आहे. राजाला पुरावा मागू नका, हे प्रजा म्हणून आम्ही कसे म्हणणार, राजाला कोण पुरावा मागणार? पण, मागितला तर राजाने तो द्यावा. छत्रपती शिवाजी महाराज‍ांपर्यंत चर्चा नेण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांचे तुम्हीं वारसदार आहात की नाही यात काहीत प्रश्न नाही. जर राऊतांनी तो प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देऊन विषय संपवून टाकावा, असे माने म्हणाले.

तुमच्या दोघांच्या भांडणात आम्हाला काहीही रस नाही. राजा भांडत असेल तर भ‍ांडू दे, प्रजेला य‍ा वादात काहीही रस नाही. भारत सरकार सगळ्यांनाच सीएएद्वारे पुरावे मागत आहे. तो महार‍ाजांनाही मागितला जाईल आणि मलाही मागितला जाईल. महाराष्ट्र शासनाने हा कायदा लागू करणार नाही, असे सांगितले आहे. पण, हा कायदा राज्यात लागू झाल्यास तुम्हाला, मला आणि संपूर्ण प्रजेला नागरिकत्व सांगणारा पुराव्याचा कागद घेऊनच पळावे लागेल, अशी टीकाही लक्ष्मण माने यांनी सीएए, एनआरसी कायद्यावरून सरकारवर केली.

Intro:सातारा : "राजा हा राजा आहे, त्याला कोण पुरावा मागणार ! त्याला पुरावा मागू नका, हे प्रजा म्हणून आम्हीं कसं म्हणणार ! तरीही राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा; संपला विषय!" अशा शब्दात माजी आमदार, 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राजघराण्यासंदर्भातील वादात उडी घेतली.
Body:छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान मोदी यांच्यातील तुलनेवरुन निर्माण झालेल्या वादाने वेगळे वळण घेतले आहे. खासदार राऊत यांच्या निषेधार्थ गुरुवारी साता-यात बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

'उपरा'कार लक्ष्मण माने म्हणाले, "खासदार संजय राऊत यांनी राजघराण्यातील वंशजांना पुरावा मागितला तर त्यात चुकीचं काय आहे. पुरावा मागितला म्हणजे दिलाच पाहिजे असं काही नाही. खरं म्हणजे जे दोघे परस्परांवर बोलत आहेत, त्यांचा अापसातचा हा वाद आहे. राजाला पुरावा मागू नका, हे प्रजा म्हणून आम्हीं कसं म्हणणार ! राजाला कोण पुरावा मागणार ! पण मागितला तर राजाने तो द्यावा; संपला विषय. छत्रपती शिवाजी महाराज‍ांपर्यंत चर्चा नेण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांचे तुम्हीं वारसदार आहात कि नाहीत? त्यात काही प्रश्न आहे का? असला तर राऊतांला स‍ांगून टाका कि हे त्याचं उत्तर आहे, विषयच संपतो!"

तुमच्या दोघांच्या भांडणात आंम्हाला काहीही रस नाही. राजा भांडत असेल तर भ‍ांडू दे, प्रजेला य‍ा वादात काहीही रस नाही. भारत सरकार सगळ्यांनाच पुरावे मागत आहे. (सीएए, एनआरसी कायदा) तो महार‍ाजांनाही मागितला जाईल आणि मलाही मागितला जाईल. महाराष्ट्र शासनाने हा कायदा लागू करणार नाही, असं सांगितलं आहे. पण हा कायदा राज्यात लागू झाल्यास तुम्हांला, मला आणि आख्या प्रजेला नागरिकत्व सांगणारा पराव्याचा कागद घेऊनच पळावे लागेल, अशी टिकाही लक्ष्मण माने यांनी सीएए, एनआरसी कायद्याच्या अनुषंगाने केली.

कॅपशन
बोलताना 'उपरा'कार लक्ष्मण माने

______________________Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.