ETV Bharat / state

साताऱ्यातील परिचारिकेचा कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये मृत्यू

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकेचा कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्योती राक्षे (वय ४२) असे त्यांचे नाव होते.

author img

By

Published : Apr 25, 2020, 5:47 PM IST

nurse dies in Krishna Hospital in karad
साताऱ्यातील परिचारिकेचा कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये मृत्यू

सातार - क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकेचा कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ज्योती राक्षे (वय ४२) असे त्यांचे नाव होते. गेल्या ४ दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मेंदूला सूज आल्याने तसेच मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय सुत्रांचे म्हणणे आहे.

ज्योती राक्षे या औंध (पुणे) येथे परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यांची गेल्यावर्षी सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बदली झाली होती. सध्या त्या कोरोनाकक्षात कार्यरत होत्या. मेंदूच्या आजारामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या कोरोना वॉर्डशी संबंधीत असल्याने त्यांच्या घश्यातील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.