ETV Bharat / state

गव्यांना पाव खाऊ घालणाऱ्यास महाबळेश्वमध्ये वनविभागाने दिली नोटीस - Forest Department latest news

पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधीनियम १९७२नुसार कार्यावाही सुरू असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

महाबळेश्वर गवा
महाबळेश्वर गवा
author img

By

Published : Mar 9, 2021, 4:18 PM IST

Updated : Mar 9, 2021, 5:39 PM IST

सातारा - क्षेत्र महाबळेश्वरच्या रांजणवाडीचे इब्राहिम पटेल जंगली गव्यांना पाव खायला घालत असल्याच्या व्हायरल व्हिडिओने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याची दखल घेत वनविभागाने संबंधिताला वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे. वन्यजीव अभ्यासकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत तो तातडीने थांबवावा, असे मत व्यक्त केले आहे.

भिती मोडली

इब्राहिम महंमद पटेल (रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) यांच्या नावे महाबळेश्वरजवळ शेती व हॉटेल आहे. त्यांच्या शेतात गेल्या काही महिन्यापासून सायंकाळच्या वेळेला गवे चरायला येत होते. प्राणिमात्रांवरील दयेतून पटेल या गव्यांना खाण्यासाठी पाव टाकू लागले. हा रोजचा उपक्रम झाला. दोघांचीही भिती मोडल्याने पटेलचाचा गव्यांना हाताने पाव भरवू लागले. याचा व्हिडिओ पटेल यांनी व्हायरल केला.

वनविभागाची नजर

समाजमाध्यमांमध्ये यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. वनविभागाने या व्हिडिओची दखल घेत पटेल यांना नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदवला आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवने नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधीनियम १९७२नुसार कार्यावाही सुरू असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

अशा वन्यजीवांपासून धोका

"वन्यजीवांना मानवनिर्मित खाद्य भरवणे हे निसर्गविरोधी कृती आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवल्याने त्यांना त्याची सवय लागते. ज्यावेळी हे पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा माणसांवर हल्ले करून ते हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. यातून माणसाच्या किंवा वन्यजीवाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, असा सतर्कतेचा इशारा साताऱ्याचे माजी मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.

मनुष्याला आजार संभवतो

कराडचे वन्यजीव अभ्यासक भाटे म्हणाले, "निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची योग्य काळजी घेतच असतो. त्यामुळे वन्यजीवांना मानवी खाद्य भरवण्याची गरज नसते. मोर, माकड, कबुतरे अशा प्राण्यांना बाह्य खाद्य घालु नये." वन्यजीवांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.

Last Updated : Mar 9, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.