ETV Bharat / state

दुष्काळमुक्तीसह बेरोजगारी संपवून महाराष्ट्र समृद्ध करायचाय - बानगुडे पाटील - सातारा विधानसभा निवडणूक 2019

माण खटाव रहिवासी संघ मुंबई आयोजित माण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे मेळावा संपन्न झाला. यावेळी नितीन बानगुडे पाटील बोलत होते.

नितीन बानुगडे पाटील
author img

By

Published : Oct 14, 2019, 9:28 PM IST

सातारा - २०१९ च्या या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एक विचार घेऊन चालली आहे. हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त कर्जमुक्त, बेरोजगारमुक्त, गुन्हेगारीमुक्त करायचा आहे. लोकांना रोजगार देत हा महाराष्ट्र संपन्न व समृध्द बनवायचा आहे. यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे. याची सुरुवात माण खटावमधून शेखर गोरेंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन करावी, असे आवाहन शिवसेना उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी केले आहे.

माण खटाव रहिवासी संघ मुंबई आयोजित माण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे मेळावा संपन्न झाला. यावेळी बानुगडे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे, शिवसेना माण खटाव संपर्क प्रमुख शंकरभाई विरकर, रंगकामगार संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजी सावंत आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा- शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर

नितीन बानुगडे पाटील म्हणाले, माणखटाव दुष्काळी भाग माझ्या जन्मापासून ऐकत आलो आहे. दुष्काळी भागातील शेकडो कुटुंबांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई व उपनगरात जगण्यासाठी यावे लागत आहे. मागील पन्नास वर्षात नक्की काय झाले जनावरे छावणीला जनता दावणीला. पन्नास वर्षात तोच खर्च माणखटावच्या पाणी प्रश्नावर खर्च केला असता, तर दुष्काळ कधीच हटला असता, अशी टीकाही त्यांनी केली.

कडकनाथ आधी तुझ बघ मग दुसऱ्याची माप काढ - शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे

यावेळी शेखर गोरे म्हणाले, ते सदाभाऊ खोत आता कडकनाथ म्हणून ओळखले जावू लागले आहेत. ते लोकसभेला उभे राहिले. त्यांना दुष्काळी माण खटावच्या जनतेने मते दिली. पण हा बहाद्दर परत इकडे फिरकलाच नाही. अन आता म्हणताय आपल्या जयाभाऊला निवडून द्या. येथे आम्हाला हक्काच कायमच पाणी पाहिजे. तरुणांना रोजगार पाहिजे. ही माझी जनता गाव सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आली आहे. हाच रोजगार जर आपल्या मातीत मिळाला असता तर इतक्या लांब यायची गरज होती का. या स्वार्थी राज्यकर्त्यांनी फक्त या भोळ्याभाबड्या जनतेचा मतांसाठी वापर करून घेतला आहे.

हेही वाचा - मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे

आरे कडकनाथ आधी तुझ बघ मग दुसऱ्याची माप काढ. जिकडे जाईल तिकडे यांना भीती आहे कोणी कोंबड्या फेकतय की काय. परवा तर म्हसवडला म्हणे मुख्यमंत्र्यापेक्षा खोत यांच्या बंदोबस्तासाठीच जास्त फौजफाटा होता. तुम्हाला राज्यात फिरायची सोय राहिली नाही. एखादे पहाटेच कोंबडे आरवल तरी हे लगेच जागे होतात. अन हे आमची माप काढत आहेत. माजी लोकप्रतिनीधी ते कडकनाथ व खासदार यांची ही टोळी आहे. एकमेकांचे उद्योग मिटवायचे, वाढवायचे हे त्यांच उद्योग. ही टोळी माण खटावला लुटायला आली आहे. पण घाबरू नका त्यांचा बंदोबस्त करायला मी खंबीर आहे. यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी मला एक संधी द्या, असे आवाहन शेखर गोरे यांनी केले.

Intro:सातारा २०१९ च्या या विधानसभा निवडणूकीत शिवसेना एक विचार घेऊन चाललीय.हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त कर्जमुक्त ,बेरोजगारमुक्त ,गुन्हेगारीमुक्त करायचाय.लोकांना रोजगार देत हा महाराष्ट्र संपन्न व समृध्द बनवायचाय यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे. याची सुरूवात २१ तारखेला आपण धनुष्यबाणाच चिन्ह दाबत माण खटावमधून शेखर जी गोरेंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन करावी.२४ तारखेला शेखरजी गोरे मुंबईत येतील ते माण खटावचे आमदार म्हणून विधीमंडळात दाखल होतील .तो दिवस माण - खटावच्या परिवर्तनाचा ,समृध्दी व संपन्नतेचा पहिला दिवस असेल.माण खटावमध्ये शेखरजींनी जे कार्य केले आहे ते संपूर्ण राज्यात कोणीही केले नाही.त्यामुळे कोणाच काहीही ठरूद्यात पण आता माण खटावच्या जनतेनेच ठरवलंय "अबकी बार ,शेखरभाऊच आमदार "असे प्रतिपादनही शिवसेना उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.नितीन बानुगडे पाटील यांनी केले आहे.
Body:माण खटाव रहिवासी संघ मुंबई आयोजित माण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखरभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे भव्य मेळावा संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.यावेळी शिवसेनेचे उमेदवार शेखरभाऊ गोरे , शिवसेना माण खटाव संपर्क प्रमुख शंकरभाई विरकर,रंगकामगार संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजीराव सावंत,युवा उद्योजक संदीपशेठ घोरपडे,शिवसेना वाहतूक सेनाप्रमुख संभाजी जगताप,जि.प.सदस्य बाबासो पवार ,रामदासशेठ शेवाळे,राहूल कोळी ,राजेंद्र जाधव ,रमेश डुबल ,उद्योगपती किरण जाधव यांच्यासह विविध मान्यवर तसेच हजारों मतदार बंधू भगिनी उपस्थित होते.
ना.नितीन बानुगडे - पाटील म्हणाले ,आपण सर्वांनी भगव्याचे शिलेदार व्हाव हा भगवा श्रीकृष्णाचा ,प्रभू श्रीरामांचा ,शिवरायांचा वारकऱ्यांचा ,धारकऱ्यांचा ,तुमचा आमचा आहे.तोच भगवा शेखरजींनी खांद्यावर घेतला आहे.हा भगवा आपल्या माणखटावमध्ये फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा.ती अपेक्षा तुम्ही निश्चितच पूर्ण कराल असा विश्वास आम्हाला आहे.
माणखटाव दुष्काळी भाग माझ्या जन्मापासून ऐकत आलोय.दुष्काळी भागातील शेकडो कुटूंबांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई व उपनगरात जगण्यासाठी यावे लागतेय. मागील पन्नास वर्षात नक्की काय झाले जनावरे छावणीला जनता दावणीला. पन्नास वर्षात तोच खर्च माणखटावच्या पाणी प्रश्नावर खर्च केला असता तर दुष्काळ कधीच हटला असता. माणखटावच्या मातीला एकच नांव आकार देऊ शकते त्याचे नाव शेखरजी गोरे आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतल्या कृष्णा खोऱ्याच्या सिंचन योजना आघाडीच्या काळात रखडल्या गेल्या.पण या योजना आपल्याच काळात पूर्ण होऊन त्याची उदघाटने करण्याचे भाग्य आपल्यालाच मिळणार असून त्याचे नारळ आमदार म्हणून शेखरजी गोरेच फोडतील.मराठा आरक्षणासाठी शिवसेना लढली.आरक्षणासाठी ३६ जणांनी जिव दिले त्यांच्या कुठूंबियाचे काय याच कोणालाही काही पडले नव्हते.मात्र त्या कुटूंबांना आधार देत शिवसेनेने त्या कुटंबातील प्रतिनीधीला परिवहन खात्यात नोकरी मिळवून दिली.शिवसेना ही सर्वसामान्यांची कष्टकऱ्यांची आहे.दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेखरजींना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शेखरभाऊ गोरे म्हणाले ,ते सदाभाऊ आता कडकनाथ म्हणून ओळखू लागलेले लोकसभेला उभ राहिल होत त्यांना या दुष्काळी माण खटावच्या जनतेने मत दिली पण हा बहाद्दर परत इकड फिरकलाच नाही अन आता म्हणतय आपल्या जयाभाऊला निवडून द्या अर तुझ्या जयाभाऊला तुझ्या घरी गेऊन जा.इथ आम्हाला हक्काच कायमच पाणी पाहिजे.तरूणांना रोजगार पाहिजे.ही माझी जनता गाव सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलीय.हाच रोजगार जर आपल्या मातीत मिळाला असता तर इतक्या लांब यायची गरज होती का हो.या स्वार्थी राज्यकर्त्यांनी फक्त या भोळ्याभाबड्या जनतेचा मतासाठी वापर करून घेतलाय.
यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही.दहा वर्षात माजी लोकप्रतिनीधी कायमस्वरूपी पाणी आणू शकल नाय .मला अजून दोन वर्ष द्या मी पाणी आणतो म्हणत पाण्यावर पुन्हा एकदा भीक मागतय.जलक्रांती केलीय म्हणत जलनायक म्हणून मिरवतय मग ८१ गावात पाण्यासाठी टँकर लागतायत याचे उत्तर तू दे असा सवालही त्यांनी केला.खासदारकीला मी त्या घाटाखालच्याला मदत करत नव्हतो कारण मला माहित होत हे कुणाच पिल्लू आहे ते शंभर टक्के उलटणार. पण मला सीएम साहेबांनी बोलवून घेतल व म्हटले मी तुमच्या माण खटावच्य सर्व सिंचन योजना मार्गी लावणार आहे मला फक्त तिथून खासदार द्या.त्यांच्या विनंतीवरून आपण स्वत:ची यंत्रणा लावून चांगली मते मिळवून दिली. आपल्या सह महायुतीच्या सर्वच पक्षांनी मदत करून खासदारकीला मत देऊन स्वप्नातला खासदार केल.त्याच्या मित्राची त्याला किती मत मिळाली ते एकदा विचार एकट्याला म्हणाव.तुमच्या दोघांत मी लुडबुड करणार नाही अस म्हणत स्वत:च्या मुलीची खोटी शपथ घेत होत.आज ते काय करतय ते सगळी बघातयत ते तुमच काय करेल हे लक्षात घ्या.अन ते मुंबईच्या सभेत म्हणतय या जयकुमारच्या पुढ सगळी लुंगीसुंगी हायती.ज्यांनी निवडून दिल त्यांना हा लुंगीसुंगी म्हणतोय पण एक लक्षात ठेव आमच्या नादाला लागला तर या शेखर गोरेशी गाठ आहे.तुमच्या टोळीला आता ही जनता घाबरणार नाही तिला माहित आहे आता आपल्या पाठीमागे शेखरभाऊ आहे. साड्या ,पेन ,वह्या ,डायऱ्या साठ रूपयांच्या दिल्या म्हणताय अर ते कितीही किंमतीच असू दे पण माताभगिनींचा मानसन्मान करण्याच धाडस मी केलेय तुझ्यासारख अन्याय तर नाही केला. मला कायमस्वरूपी पाणी,उद्योगधंदे,महिला सक्षमीकरण महिलांचे प्रश्न ,शैक्षणिक सोयीसुविधा,मोठे हाँस्पीटल उभारायचेय ,तुम्हाला आपल्या मातीत रोजगार उपलब्ध करत परिवर्तन घडवायच मला एक संधी द्या पाच वर्ष तुमची इमानइतबारे सेवा करेन अशी भावनिक सादही त्यांनी दिली.
Conclusion:आरं कडकनाथ आधी तुझ बघ मग दुसऱ्याची माप काढ. तुला जिकड जाईल तिकड भीती कोण कोंबड्या फेकतय की काय परवा तर म्हसवडला म्हणे सीएम पेक्षा तुझ्या बंदोबस्तासाठीच जास्त फौजफाटा होता.तूला राज्यात फिरायची सोय राहिली नाही. एखाद पहाटेच कोंबड आरडल तरी हे लगेच जाग व्हतंय कोण कोंबडया फेकतय की काय म्हणून.अन तू आमची माप काढतोय.
माजी लोकप्रतिनीधी , ते कडकनाथ व खासदार यांची ही टोळी आहे.एकमेकाच उद्योग मिटवायच ,वाढवायच हे त्यांच उद्योग. ही टोळी माण खटावला लुटायला आलीय पण घाबरू नका त्यांचा बंदोबस्त करायला मी खंबीर आहे यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी मला एक संधी द्या अन धनुष्यबाणासमोरचे चिन्हावर बटण दाबून मला विक्रमी मतांनी निवडून द्या.
- शेखर गोरे माण खटाव विधानसभा उमेदवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.