ETV Bharat / state

सीएए विरोधी आंदोलनाला नवदाम्पत्याचाही पाठिंबा, विवाह नोंदणी होताच थेट आंदोलनात सहभाग - npr

जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गाडे यांची कन्या अ‌ॅड. पायल गाडे आणि याच तालुक्यातील कुडाळ येथील राजेंद्र जगताप यांचे पूत्र विक्की यांचा आज नोंदणी पध्दतीने विवाह झाला. यानंतर हे नवदांपत्य थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनआरसी विरोधी धरणे आंदोलनस्थळी आले.

सातारच्या एनआरसी विरोधी आंदोलनात नवदांपत्याच्या अभिनव सहभाग

author img

By

Published : Feb 14, 2020, 11:19 PM IST

सातारा - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या एनआरसी, सीएए, एनपीआर विरोधी धरणे आंदोलनाच्या आठव्या दिवशी आज (शुक्रवार) नवदांपत्याने हजेरी लावत पाठिंबा दिला. पाठिंबा दर्शक भाषण करून थोडावेळ त्यांनी आंदोलनात ठिय्याही मारला.

सातारच्या एनआरसी विरोधी आंदोलनात नवदांपत्याचा सहभाग

जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गाडे यांची कन्या अ‌ॅड. पायल गाडे आणि याच तालुक्यातील कुडाळ येथील राजेंद्र जगताप यांचे पूत्र विक्की यांचा आज नोंदणी पध्दतीने विवाह झाला. यानंतर हे नवदांपत्य थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनआरसी विरोधी धरणे आंदोलनस्थळी आले. यावेळी भारतीय राज्य घटनेची मोडतोड करण्याचे काम सध्याचे केंद्र सरकार करत आहे. हे आम्ही सहन करणार नाही आणि म्हणूनच या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे पायल गाडे म्हणाल्या.

हेही वाचा - अवैध सावकारी करुन फसवणूक, 12 जणांवर गुन्हा दाखल

यावेळी नववधूचे वडील संजय गाडे व आई शालन गाडे, वराचे वडील राजेंद्र व आई सुरेखा, अ‌ॅड. राजेंद्र गलांडे , मिनाज सय्यद, जमीर शेख, अहमद कागदी, अमजदभाई शेख, जयंत उथळे आदि उपस्थित होते. दरम्यान या आंदोलनस्थळी खूप वेगवेगळ्या विचारांचे, संघटनांचे, जाती-धर्माचे लोक येत आहेत. प्रत्येकाच्या भावना आणि विचार तीव्र स्वरुपाचे आहेत. भाषण, कविता, शेरो-शायरी, समूह गान अशा विविध मार्गांनी ते व्यक्त होत आहेत.

हेही वाचा - कुत्रा चावलेल्या रुग्णाला रेबीजच्या लसीऐवजी दिले वेदनाशामक इंजेक्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.