कराड (सातारा) - कोरोना संशयीत म्हणून 3 आणि 15 वर्षाच्या दोन मुलांना कराडमधील खासगी रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्या दोन्ही मुलांचे घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने 3 आणि 15 वर्षांच्या मुलास कराडमधील खासगी रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
दोन संशयीतांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्याच्या एनआयआयव्हीमध्ये पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्रशासनाला नुकताच प्राप्त झाला असून दोघांच्याही नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.